मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम अहवालात गडबड, AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम अहवालात गडबड, AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासाला मुंबईमध्ये वेग आला आहे. दरम्यान AIIMSचे डॉ सुधीर गुप्तांनी असे म्हटले आहे की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासाला मुंबईमध्ये वेग आला आहे. दरम्यान AIIMSचे डॉ सुधीर गुप्तांनी असे म्हटले आहे की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासाला मुंबईमध्ये वेग आला आहे. दरम्यान AIIMSचे डॉ सुधीर गुप्तांनी असे म्हटले आहे की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासाला मुंबईमध्ये वेग आला आहे. दरम्यान सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता (Dr Sudhir Gupta) यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालाबाबत भाष्य केले आहे. डॉ सुधीर गुप्तांनी असे म्हटले आहे की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही आहे. त्यांनी हे देखील म्हटले आहे की, मुंबई पोलिसांना या अहवालाबाबत दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक होते, मात्र तसे त्यांनी केले नाही.

फॉरेन्सिकने वेळेच्या बाबतीत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत सीबीआयने शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमवर देखील शंका उपस्थित केली आहे. याचबरोबर असा आरोप देखील केला जात आहे की, नियमांनुसार पुरावे आणि गोळा करण्यात आल्या नाही आहेत तसेच त्या सीबीआयकडे देण्यात देखील आल्या नाही आहेत.

(हे वाचा-अंडरवर्ल्डने केली सुशांतची हत्या, RAWच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा)

टाइम्स नाऊच्या एका अहवालानुसार वेळेवर सुशांतचा लॅपटॉप आणि फोन फॉरेन्सिककडे पोहचवण्यात आला नाही. सुशांतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबरोबर छेडछाड करण्यात आली आहे.  24 दिवसांनंतर सुशांतचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी देण्यात आला.

कूपर रुग्णलयातील डॉक्टरांची चौकशी

सोमवारी दुपारी सीबीआयचे एक पथक कूपर रुग्णालयात दाखल झाले आणि सुमारे तासाभराने ते पथर रुग्णालयाबाहेर आले. तिथे सीबीआयने सुशांतची अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमची चौकशी केली. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या अहवालानुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्राबाबत सीबीआय टीम समाधानी नाही.

(हे वाचा-सुशांतवर Black Magic? आत बाबा-बुवाही येणार CBI चौकशीच्या फेऱ्यात)

सोमवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीची देखील चौकशी केली. चक्रवर्ती परिवारातील रोहित पहिला सदस्य आहे, ज्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे सुशा्ंतचा कुक नीरज आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची देखील चौकशी करण्यात येत आहे.  याबरोबरच हाऊस हेल्पर केशवची देखील चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: CBI, Sushant Singh Rajput