सुशांतचा 'तो' फोटो पोस्ट करत असाल तर सावधान! होऊ शकते कारवाई

सुशांतचा 'तो' फोटो पोस्ट करत असाल तर सावधान! होऊ शकते कारवाई

रविवारी दुपारी सुशांतच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत होता. मात्र यातच सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड दिसून येत होता.

  • Share this:

मुंबई, 15 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्या करत संपूर्ण देशाला हादरून सोडलं. रविवारी दुपारी सुशांतच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत होता. मात्र यातच सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड दिसत होता. तो म्हणजे सुशांतच्या मृतदेहाचे फोटो अपलोड करण्याचा. चित्रपटाच्या कलाकारांपासून ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत मृतदेहाचे फोटो अपलोड करू नका, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, आता महाराष्ट्र सायबर सेलनेही निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलनं ट्वीट केलं आहे की, सोशल मीडियावर सध्या एक चिंताजनक ट्रेंड दिसत आहे. यात दिवंगत सुशांत सिंह राजपूत यांचा फोटो व्हायरल केला जात आहे. हे फारच वाईट आणि त्रासदायक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सायबर सेलनं कारवाईचेही आदेश दिले आहे. ट्विटमध्ये त्य़ांनी, सोशल मीडियावर असे फोटो पसरवणं कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

वाचा-सुशांतच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप

वाचा-सुशांतसोबतच्या ब्रेकअपवर अंकितानं महिन्याभरापूर्वीच दिली होती प्रतिक्रिया

दुसर्‍या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबरने असे चित्र सामायिक करण्यास टाळावे असे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर पसरलेला व्हायरल झालेला तो फोटो काढून टाकण्यात यावा, असेही ट्वीट केले आहे.

दरम्यान, सुशांतवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या वडिलांसह त्याचे कुटुंब मुंबईत पोहचले आहे. रविवारी रात्री उशीरा सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, यात त्यानं आत्महत्याचं केल्याचं निष्पण्ण झालं. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. गेले 6 महिने तो नैराश्येत होता. त्यामुळं नैराश्येतूनच त्यानं टोकाचं पाऊल उचललं असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा-"अशी चूक पुन्हा करणार नाही", सुशांतच्या आत्महत्येनंतर करण स्वत:ला मानतोय दोषी

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 15, 2020, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading