मुंबई, 15 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी रविवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण समजलेलं नाही. मात्र त्याच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांत मागच्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होता अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलीसांना दिली. काही वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय होती. फक्त रील लाइफमध्येच नाही तर रिअल लाइफमध्ये सुशांत-अंकिता एकमेकांना डेट करत होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर या दोघांनी या विषयावर बोलणं नेहमीच टाळलं मात्र काही दिवसांपूर्वीच अंकितानं यावर प्रतिक्रिया दिली होती. महिन्याभरापूर्वीच न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हमध्ये अंकितानं तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिच्या एका चाहत्यानं तिला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारला होता. ज्याचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, आयुष्यात खूप अप्स अँड डाउन्स येतात, खूप लोकं येतात आणि जातात पण परिवार असा असतो की जो कायम आपल्या बरोबर असतो. तिने नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिला आहे. कोण आहे रिया चक्रवर्ती? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होतेय तिची चर्चा
सुशांत आणि अंकितानं एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. शोमध्ये ही जोडी हिट तर झालीच पण सेटवरील त्यांची मैत्री प्रेमात बदलली. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं काही वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यावेळी त्यांच्या लग्नाच्या चर्चाही झाल्या होत्या. मात्र नंतर अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले.
सुशांतनं ‘कई पो छे’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा ‘छिछोरे’ हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या सिनेमात आत्महत्या करण हा अखेरचा उपाय नाही असा संदेश देणाऱ्या सुशांतनं स्वतः मात्र तेच टोकाचं पाऊल उचललं. सुशांतची धक्कादायक एक्झिट! धोनीच्या CSK नं दिली पहिली प्रतिक्रिया, असा शेवट…