अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली होती अशी वृत्त व्हायरल होताना दिसत आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं पोलीस चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. तिचं म्हणण्याप्रमाणे सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती.
सुशांत सिंह राजपूतने केरळमध्ये आलेल्या पूराच्या वेळी पीडितांसाठी 1 कोटी 25 लाख रुपये दान केले होते.
काही मुलांना नासामध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्याचं सुशांतचं स्वप्न होतं. ज्याचा उल्लेख त्यानं त्याच्या कुटुंबीयांकडे आणि जवळच्या मित्रांकडे अनेकदा केला होता आणि या प्रोजेक्टवर तो काम सुद्धा करत होता.
याशिवाय सोशल मीडियावरून अनेक मुलांनी सुशांतकडे मदत मागितली होती आणि त्यानं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.
या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की, सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. पण तो डिप्रेशनमध्ये होता आणि हेच त्याच्या आत्महत्येचं कारण ठरलं.