Home /News /entertainment /

सिनेमात ज्या मुलाला मरणातून वाचवलं, त्यानेच सुशांतसाठी लिहिली इमोशनल पोस्ट

सिनेमात ज्या मुलाला मरणातून वाचवलं, त्यानेच सुशांतसाठी लिहिली इमोशनल पोस्ट

सुशांतचा ऑनस्क्रीन मुलगा मोहम्मद समदने त्याच्यासाठी इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. समदने छिछोरे सिनेमात सुशांतचा मुलगा राघवची भूमिका साकारली होती.

  मुंबई, 15 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं वयाच्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या राहत्या घरी त्यानं गळफास घेत आत्महत्या केली. त्यानं अशा अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर अनेकांनी त्याला सोशल मीडियावर पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली आहे. यात सुशांतचा ऑनस्क्रीन मुलगा मोहम्मद समदने त्याच्यासाठी इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. समदने छिछोरे सिनेमात सुशांतचा मुलगा राघवची भूमिका साकारली होती. जो इंजिनिअरिंगच्या परिक्षेत यश न मिळाल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुशांतचा हा शेवटचा सिनेमा रिलीज झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. समदने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, ‘एक सुशिक्षित व्यक्ती असं कसं करू शकते. मी तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो होतो. पण बऱ्याच गोष्टी शिकायच्या बाकी सुद्धा होत्या. मला अद्याप विश्वास बसत नाही आहे. देव तुम्हाला स्वर्गात सर्वश्रेष्ठ स्थान देवो. भावपूर्ण श्रद्धांजली सर.’ सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नवी अपडेट, 'या' 8 लोकांची होणार चौकशी
  काय आहे छिछोरेची कथा छिछोरे एका अशा मुलाची गोष्ट आहे जो इंजिनिअरिंगच्या परिक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. एका उंच इमारतीवरून उडी मारून तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा जीव वाचतो आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. डॉक्टर्स सांगतात की, मुलाची शारिरीक हालत ठिक होऊ शकते पण त्याच्या मनात जगण्याची इच्छा नाही त्याला मरायचं आहे. Sushant Singh Suicide: 'महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही,केंद्राने तपास करावा' डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून अनिरुद्ध म्हणजे सुशांत सिंह राजपूत ठरवतो की, मी माझ्या मुलाला परत आणेन त्याच्या मनात जगण्याची उमेद निर्माण करेन. तो त्याला शक्य असलेले सर्व प्रयत्न करतो आणि त्यात तो यशस्वी सुद्धा झाला. मात्र हे सर्व सिनेमात घडलं. रिअल लाइफमध्ये मात्र त्याच सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. अंकितानं सुशांतच्या लगावली होती कानशिलात, नाईट क्लबमध्ये 'त्या' काय घडलं
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या