दिशा सॅलिअन आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहितीने खळबळ

दिशा सॅलिअन आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहितीने खळबळ

जेव्हा सुशांत प्रकरणाचा तपास करत असता दिशा सॅलियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी करून पाहिली असता तेव्हा....

  • Share this:

 

मुंबई, 24 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे होते आहे. सीबीआयची टीम प्रत्येक मुद्याचा बारकाईने तपास करत आहे. अशातच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांआधी म्हणजे 8 जून रोजी दिशा सॅलियनने आत्महत्या केली होती. पण, ज्या दिवशी दिशाने आत्महत्या केली होती, त्यानंतर तिचा फोन हा सुरूच होता. तिच्या फोनवरून काही व्हॉट्सअॅप फोन करण्यात आले होते' अशी माहिती समोर आली आहे.

दिशाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. पण तिचा फोन हा आढळून आला नाही. त्यामुळे तिचा फोन हा तब्बल दहा दिवस सुरू होता, अशी माहिती मुंबईतील पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर दिशाचा फोन हा फॉरेंसिक विभागाकडे पाठवला पण, त्याला काही दिवस लागले होते. त्यानंतर तो फोन जमा करण्यात आला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

जेव्हा सुशांत प्रकरणाचा तपास करत असता दिशा सॅलियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी करून पाहिली असता तेव्हा दिशाचा फोन हा फॉरेंसिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. नेमकं तिच्या फोन मधून कुणाला फोन करण्यात आले, तिचा फोन दहा दिवस हा सुरू कसा होता, याबद्दलचा रिपोर्ट अद्याप आला नाही.

दरम्यान,अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशीला आता वेग आला आहे. सीबीआयच्या पथकाने रविवारी पुन्हा एकदा सुशांतच्या घरी जात चौकशी केली. त्यानंतर आता सोमवारी (24 ऑगस्ट)ला सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही रिया चक्रवर्ती भोवतीच फिरत असल्याने या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दिशाचा आत्महत्येआधीचा व्हिडिओ आला होता समोर!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशाने ज्या दिवशी आत्महत्या केली होती, त्या दिवशीच्या पार्टीतला व्हिडिओ समोर आला होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 8 जूनला ही पार्टी झाली होती. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या एक तासा आधीचा हा  व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आणि तिचे मित्र काश्मिर सिनेमातील गाण्यावर नाचत आहे. दिशाही मनमुरादपणे डान्स करत आहे.  दिशानेच हा व्हिडिओ आपल्या  मित्रांना व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले होते. त्याचाही तपास केला जात आहे.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 2:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या