मुंबई, 01 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात रोज नवी घडामोडी समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी याप्रकरणी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पाटणा पोलीस एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीगार्डने रिया चक्रवर्तीवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने काही धक्कादायक वक्तव्य याप्रकरणाबाबत केली आहेत. सुशांतच्या बॉडीगार्डने एका खाजगी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. ज्यामध्ये तो असे देखील म्हणाला आहे की जर 40 वर्षांनी सुशांतच्या वडिलांनी याबाबत काही पावलं उचलली आहेत, तर यामध्ये काहीतरी तथ्य असणार. (हे वाचा- SSR Death: सुशांतच्या बहिणीची याप्रकरणी लक्ष घालण्याची पंतप्रधानांना विनंती ) बॉडीगार्डने यावेळी अशी माहिती दिली की, ‘सुशांत सरांच्या आयुष्यात रिया मॅम आल्यानंतर ते नेहमी आजारी राहू लागले. जेव्हा सुशांत सर बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली असणाऱ्या खोलीमध्ये असायचे तेव्हा वरच्या मजल्यावरील खोलीत पार्टी सुरू असायची. या बड्या पार्टींचं आयोजन रिया मॅम करायच्या ज्यामध्ये त्यांची आई, भाऊ आणि मित्र येत असत.’ या बॉडीगार्डच्या मते या पार्ट्यांमध्ये कधी सुशांतचे वडील दिसायचे नाहीत. हे सर्व उगाचच केलेले खर्च होते, ज्यामध्ये सुशांत सहभागी नाही व्हायचा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. त्याने अशी देखील माहिती दिली की रियाने सुशांतचा सर्व जुना स्टाफ बदलला होता, केवळ मीच शिल्लक राहिलो होतो जो त्यांच्याबरोबर होतो. (हे वाचा- बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला खाजगी फोटोंवरून केलं ब्लॅकमेल, 25 वर्षीय तरुण गजाआड ) बॉडीगार्डने अशी माहिती दिली की, 2019 मध्ये सुशांत रियाला भेटला होता. त्यानंतर ते युरोप ट्रीपवर देखील गेले होते. तिथून परतल्यानंतर सुशांत सारखा आजारी पडत होता. त्याआधी सुशांत खूप सक्रीय होता. जिम, स्विमिंग, डान्स हे सर्व तो करायचा. मात्र त्यानंतर तो अधिकतर बेडवरच राहू लागला होता. सुशांतच्या औषधांबाबत बोलताना हा बॉडीगार्ड म्हणाला की, ‘औषधांबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र जेव्हा कधी मी औषधे आणण्याासाठी मेडिकलमध्ये जात असे, तेव्हा मला विचारण्यात येत असे की औषधे कुणासाठी आहेत? कुणी मागवली आहेत? या प्रश्नांवरून वाटायचे की काहीतरी भयंकर औषधे आहेत, ज्यामुळेच साहेब नेहमी झोपून असतात.’ (हे वाचा- रिया चक्रवर्ती वादात; सुशांतच्या जवळच्या व्यक्तींनी काय काय केलेत आरोप वाचा ) सुशांतच्या बॉडीगार्डने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, रिया त्याच्या आयुष्यात आल्यानंतर सुशांत खूप बदलला होता. त्याची बॉडी लँग्वेज देखील बदलली होती. गेल्या वर्षभरात सुशांतच्या कुटुंबीयांचे येणे-जाणे कमी झाल्याची माहितीही यावेळी त्याने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







