'त्याचा कुणी गॉडफादर नव्हता...', सुशांतच्या बहिणीची याप्रकरणी लक्ष घालण्याची पंतप्रधानांना विनंती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 01 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी रोज नवीन घडामोडी घडत आहेत. आधी मुंबई पोलीस, त्यानंतर बिहार पोलीस आणि आता ईडीने याप्रकरणी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणातील वेगवेगळे कांगोरे समोर येत आहेत. दरम्यान सुशांतचे कुटुंबीय सुशांतला न्याय मिळावा हि मागणी करत आहेत. सुशांतची बहिण श्वेत सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. 'मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आणि माझी अशी विनंती आहे की हे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा स्कॅन केले जावे. भारताच्या कायदेव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत', अशी कॅप्शन देत श्वेता सिंह किर्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये श्वेताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएमओ च्या इन्स्टाग्राम अकाउंटना टॅग केले आहे.
    (हे वाचा-रिया चक्रवर्ती वादात; सुशांतच्या जवळच्या व्यक्तींनी काय काय केलेत आरोप वाचा) श्वेताने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मला माझं मन सांगते की, तुम्ही सत्यासाठी आणि सत्याबरोबर उभे राहाल. आम्ही साध्या कुटुंबातील आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता किंवा आताही आमचा कुणीही नाही आहे. तुम्ही या प्रकणात लक्ष घालावे अशी माझी विनंती आहे आणि याची खात्री करून घ्यावी की सर्वकाही योग्य पद्धतीने हाताळले जात आहे तसंच कोणत्याही पुराव्याबरोबर छेडछाड केली जात नाही आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा' (हे वाचा-आत्महत्येच्या रात्री काय झालं? सुशांतच्या घरी असलेल्या मित्रानेच केला खुलासा) श्वेताने सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूत बाबतच्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. वेळोवेळी तिने 'सत्याचा विजय होईल' असे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि श्वेता देखील यानंतर संपर्कात आल्याची माहिती समोर आली होती. अंकिताने बिहार पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, तिने सुशांतची बहिण श्वेता सिंहला असे सांगितले होते की, मणिकर्णिकाच्या प्रमोशन दरम्यान सुशांतने तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. या दरम्यान 2018 मध्ये त्यांच्यात बरीच बातचीत देखील झाली होती. त्यावेळी भावुक होऊन त्याने तिला सांगितले होते ती, तो त्याच्या रिलेशीपमध्ये कंटाळला आहे. त्याला हे नाते संपवायचे होते कारण रिया त्याला खूप त्रास देत होती. हे चॅट तिने सुशांतच्या परिवाराला देखील दिल्याची माहिती मिळते आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: