Home /News /crime /

बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला खाजगी फोटोंवरून केलं ब्लॅकमेल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला खाजगी फोटोंवरून केलं ब्लॅकमेल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचने एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तिच्या काही खाजगी फोटोंवरून हा नराधम तिला ब्लॅकमेल करत होता

    मुंबई, 01 ऑगस्ट : मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एका नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेना (Mumbai Police Crime Branch) एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तिच्या काही खाजगी फोटोंवरून हा नराधम तिला ब्लॅकमेल करत होता.  त्याने अभिनेत्याच्या मुलीकडे पैशाची मागणी केली होती. पैसे न दिल्यास फोटो लीक करण्याची धमकी तिला दिली होती. एका मीडिया अहवालानुसार हा तरुण मालाड याठिकाणचा रहिवासी आहे. गुरुवारी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने त्याच्या मुसक्या आवळल्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार हा तरुण मुंबईतील मालाड याठिकाणी राहणारा होता. तर त्याचे नाव कुमैल हनिफ पटाणी असे आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट 11 ला त्याला पकडण्यात यश मिळाले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांतर्गत महिलेचा विनयभंग आणि खंडणी मागण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवरही माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा-SSR Death: सुशांतच्या बहिणीची याप्रकरणी लक्ष घालण्याची पंतप्रधानांना विनंती) महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीची बहिण आणि पीडित मुलगी या दोघी एकमेकिंना ओळखत होत्या. त्या दोघी एकाच महाविद्यालयामध्ये शिकत असल्यामुळे त्यांची ओळख होती. या तरुणाने अभिनेत्याच्या मुलीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचे तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले आहे. आरोपीने तिला असे सांगितले होते की, तो तिला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतो आणि तेव्हापासून तिचे काही खाजगी फोटो त्याच्याकडे आहेत. (हे वाचा-रिया चक्रवर्ती वादात; सुशांतच्या जवळच्या व्यक्तींनी काय काय केलेत आरोप वाचा) वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीने पीडितेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवले होते आणि त्याचे पुरावे राहू नयेत याकरता त्याने ते डिलिट देखील केले. कुमैलने या अभिनेत्याच्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने मुलीला बोलावून खंडणीची मागणी केली.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या