अभिनेता सोनू सूदला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे BMC ला आदेश

अभिनेता सोनू सूदला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे BMC ला आदेश

अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) सोनू सूदला दिलेल्या नोटीस प्रकरणी हा दिलासा आहे.

  • Share this:

मुंबई, 05 फेब्रुवारी: अभिनेता सोनू सूदला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) सोनू सूदला दिलेल्या नोटीस प्रकरणी हा दिलासा आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सोनू सूद विरोधात सध्या कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश पालिकेला दिले आहेत. दरम्यान सोनू सूदकडून न्यायालयात असे सांगण्यात आले आहे की, सुप्रीम कोर्टातून तो त्याने केलेली याचिका मागे घेणार आहे. शिवाय हा एकंदरित वाद महानगर पालिकेकडे सोडवणार असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. सर न्यायाधीशांनी असे म्हटले आहे की हे एक चांगले पाऊल आहे.

सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अभिनेता सोनू सूदमे दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला आव्हान देणारी सोनू सूदची याचिका फेटाळली होती. त्याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. जुहू याठिकाणी रहिवासी इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याचा अभिनेता सोनू सूदवर आरोप आहे. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यन यांचे खंडपीठाने सोनू सूदची बाजू ऐकली.

यानंतर अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने 'न्याय मिळतोच' (Justice prevails) असे कॅप्शन देत एक निवेदन शेअर केले आहे. यामध्ये त्याने एक हॅरिसन फोर्ड यांचा एक quote देखील लिहिला आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'युद्धा होत नसणे म्हणजे शांतता नव्हे तर, न्याय मिळणे म्हणजे शांतता.'

(हे वाचा-नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे कुणीही नाराज नाही, अजित पवारांनी केले स्पष्ट)

बीएमसीविरुद्ध दाखल करण्यात आलेली सोनू सूदची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. बीएमसी आपल्या नोटीसप्रमाणे कारवाई करू शकत असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. अवैध बांधकाम कारवाई प्रकरणी रोख लावण्यासाठी सोनू सूदने, बीएमसीविरोधात याचिका दाखल केली होती.

(हे वाचा-सलमान खानपेक्षा हा अभिनेता खऱ्या अर्थानं ठरला कतरिना कैफचा गॉडफादर)

जुहू परिसरात सोनू सूदच्या मालकीची 6 मजली इमारत आहे. ही रहिवासी इमारत असूनदेखील या इमारतीमध्ये सोनू सूदने परवानगी न घेता हॉटेल सुरू केलं असा आरोप बीएमसीने केला होता. Maharashtra Region & Town Planning कायद्याअंतर्गत सोनू सूद विरोधात बीएमसीने जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल केली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 5, 2021, 12:18 PM IST

ताज्या बातम्या