जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बहीण सुनैनाच्या मुस्लीम बॉयफ्रेंडबाबत हृतिक रोशन म्हणतो...

बहीण सुनैनाच्या मुस्लीम बॉयफ्रेंडबाबत हृतिक रोशन म्हणतो...

बहीण सुनैनाच्या मुस्लीम बॉयफ्रेंडबाबत हृतिक रोशन म्हणतो...

अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन मागच्या काही दिवसांपासून तिच्या कौटुंबीक मतभेद आणि रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन मागच्या काही दिवसांपासून तिच्या कौटुंबीक मतभेद आणि रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. बॉयफ्रेंड मुस्लीम असल्यानं तिच्या घरातले तिच्यावर नाराज असून त्यांनी त्या मुलाला दहशतवादी म्हटल्याचं सुनैनानं सांगितलं होतं. याशिवाय तिनं कंगना रणौतला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचं ट्वीट केलं होतं. तसेच रोशन कुटुंबीय सुनैनाला तिच्या रिलेशनशिपमुळे त्रास देत असून यासाठी तिनं आमच्याकडे मदत मागितली होती असं ट्वीट कंगनाची बहीण रंगोलीनं केलं होतं. मात्र यावर रोशन कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता मात्र हृतिकनं या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं असून त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत यावर पहिल्यादाचं प्रतिक्रिया दिली आहे. हृतिकनं हिंदुस्तान टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनैनाबाबतच्या प्रश्नाचं उत्तर  देताना हृतिक म्हणाला, ‘ही आमच्या घरातील खूपच खाजगी आणि संवेदनशील गोष्ट आहे. दिदी अशा परिस्थितीतून जात आहे की, तिच्याबाबत काही बोलणं चुकीचं आहे. यावेळी माझं कुटुंब अनेक समस्यांमध्ये अडकलं आहे.’ हृतिक पुढे म्हणाला, ‘जिथंपर्यंत तिच्या बॉयफ्रेंडच्या धर्माबाबत बोललं जात आहे. तर माझ्या घरात कधीच कोणत्याही धर्मावरून बोललं जात नाही आणि त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. कदाचित कोणतंही कुटुंब अशा परिस्थितीत हतबल होईल जसं आम्ही सर्व आहोत. ’ ‘कंगनाविरोधात केस केली नाही कारण… ’ हृतिक रोशननं व्यक्त केली मळमळ

जाहिरात

या आधी सुनैनानं पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत, ती रुहैल आमीन नावाच्या एक काश्मीरी पत्रकाराला डेट करत असल्याचं कबुल केलं होतं. तसेच रुहैलसोबत तिची ओळख एका इव्हेंटमध्ये झाली होती असंही तिनं सांगितलं होतं. सुनैनाच्या मते, तिच्या वडीलांचा या  नात्याला विरोध आहे कारण रुहैल मुस्लीम आहे आणि तो एक दहशतवादी असल्याचं रोशन कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तसेच या प्रकरणात हृतिक सुद्धा वडीलांच्याच मताचा असून कुटुंबातील सर्वजण आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप सुनैनानं केला होता. संजय दत्तच्या ‘या’ मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा टीझर

काही दिवसांपूर्वी न्यूज 18 सोबत बोलताना रूहैल यांनी स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलं होतं. ते म्हणाले, ‘या घटनेनं पुन्हा एकदा आजच्या काळात जुनाट विचार संपले आहेत असं म्हणणाऱ्यासाठी ते आजही तसेच असल्याचं सिद्ध केलं आहे.’ लव्ह जिहादच्या दृष्टीकोनावर रुहैल म्हणाले, ‘हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणालाही त्याच्या धर्मावरून बोलणे हे खरं तर अपमानकारक आहे आणि यावर सर्वांनीच आवाज उठवायला हवा.’ यासोबतच आपण सुनैनाला एका कंपनीसाठी एंटरटेनमेंट कव्हर करतेवेळी भेटलो होतो हे सुद्धा कबूल केलं. त्यानंतर काही काळ आमच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता मात्र आम्ही पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो असं रुहैल यांनी सांगितलं होतं. ‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत हृतिक सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. येत्या 12 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. =============================================================== SPECIAL REPORT: बॉटल कप चॅलेंजचा ‘हा’ नवा ट्रेन्ड तुम्ही पाहिला का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात