मुंबई, 8 जुलै : कंगना रनौट आणि हृतिक रोशन यांच्यामधल्या वादाने मध्यंतरी टोक गाठलं होतं. अजूनही कंगना हृतिकबद्दल बोलायची संधी सोडताना दिसत नाही. पण हृतिक रोशनने मात्र गेल्या काही दिवसांत या विषयावर पत्रकारांशी किंवा कुणाशीही बोलणं कटाक्षाने टाळल्याचं दिसतं. हृतिक रोशनचा Super 30 येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त एका पत्रकाराशी बोलताना हृतिकने बऱ्याच दिवसांनी याविषयाबद्दल मन मोकळं केलं. कंगनाविरोधातल्या केसचं काय झालं, असं विचारल्यावर तो म्हणाला, "मी त्या स्त्रीविरोधात कुठलीही लीगल केस केलेली नाही. आणि मी तसं करू शकलो नाही, कारण एखाद्या पुरुषाला त्रास देण्यासाठी कुणी मागे लागू शकतं, हे भारतात कदाचित मान्यच नाही."
"आता माझ्या चांगलं लक्षात आलं आहे की, गुंडगिरी किंवा दादागिरीला त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर देण्याऐवजी पेशन्स ठेऊन शांतपणे त्याचा सामना करायला हवा. कारण मी कायदेशीर भाषेत प्रत्युत्तर दिलं तरी, मी आक्रस्ताळा ठरणार आणि नाही दिलं तर मी खोटा ठरणार. मी अशा कुठल्याही टोकाच्या प्रतिक्रियांपासून स्वतःला दूर ठेवायला शिकलो आहे. याचा त्रास करून घ्यायचा नाही, असं ठरवलं आहे. त्यासाठी पेशन्स ठेवायला शिकलो आहे. मला अशा प्रव कुठल्याही सबळ कारणाशिवाय किंवा सत्य नसलेल्या गोष्टींसाठी 'आवाज उठवणाऱ्या' आणि ते करताना स्वतःचं 'सबलीकरण' झालं असं मानणाऱ्या प्रवृत्तींबद्दल मला राग आहे. गेली 6 वर्षं या अशा प्रवृत्तींमुळेच ही सर्कस सुरू आहे", अशा शब्दांत कंगना रनौटबद्दल भावनांना हृतिकने वाट करून दिलं.
Super 30 : जाणून घ्या हृतिकनं साकारलेल्या या खऱ्याखुऱ्या 'हिरो' बद्दल
हृतिक रोशनच्या सुपर 30 चा दिग्दर्शक विकास बहल याच्याविरोध MeToo प्रकरणात एकीने आरोप केले होते. त्याविषयी बोलताना हृतिक म्हणाला, "महिलांविषयी वाईट दृष्टिकोन बाळगणाऱ्यांविषयी सगळ्यात पहिली भूमिका मीच घेतली होती. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे लक्षात घ्यायला हवं आणि खरं -खोटं तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. ते कोर्टच ठरवतं."
Super 30 हा चित्रपट एका शिक्षकाची भूमिका केली आहे. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. त्यांना शिकवणी देताना ते त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचाही खर्च उचलतात. ते इतके प्रसिद्ध आहेत की अनेक श्रीमंत घरातील मुलंही त्यांच्याकडे शिकवणी मिळावी म्हणून प्रयत्न करतात. पण खऱ्या आयुष्यातील हिरो आनंद कुमार यांना फार कमी लोक ओळखतात.
VIDEO- या मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेली डान्स पाहून हृतिक झाला अवाक्
आनंद कुमार पटनामध्ये ‘सुपर 30’ व्यतिरिक्त रामानुजम क्लासेसही चालवतात. या क्लासमध्ये पैसे घेऊन शिकवलं जातं. पण आनंदच्या सुपर 30 मधील मुलं मात्र रामानुजम क्लासेसमधून मिळालेल्या पैशातून शिकतात. रामनुजममध्ये सध्या 300 ते 400 मुलं शिकतात. या क्लासची दीड वर्षाची फी 27 हजार आहे. ज्या मुलांना फी देणं शक्य नाही त्यांना फ्रीमध्ये शिकवण्यात येतं. मागच्या 15 वर्षांत आनंद कुमार यांनी अशाप्रकारे शिकवलेल्या 450 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांनी IIT क्वालिफाय केलं आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. आपल्या कॉलेज लाइफमध्ये त्यांनी सायकल वरून पापड विकून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. येत्या 12 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
VIRAL FACT : मुंबई पडला माशांचा पाऊस? हे आहे सत्य