मुंबई, 14 एप्रिल : देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. परिणामी 14 तारखेला लॉकडाऊन संपेल अशी ज्यांची आशा होती, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन संपण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. अनेक कलाकार सुद्धा कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरच्या दुनियेतील त्यांचं आयुष्य मिस करत आहेत. अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) देखील लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहे. इन्स्टाग्रामवर तिने असा एक फोटो देखील शेअर केला आहे. '4 मेचं स्वप्न पाहताना...' असं कॅप्शन देत सनी लिओनीने तिचा समुद्रावरील फोटो शेअर केला आहे.
(हे वाचा-प्रसिद्ध निर्मात्याची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, याआधी आला होता हार्टअटॅक)
सनीनी निळ्या रंगाच्या बिकीनीमधला हा हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने हा फोटो क्लिक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.