मुंबई, 14 एप्रिल : चेन्नई एक्स्प्रेस (Chennai Express) या चित्रपटाचे निर्माता करीम मोरानी (Karim Morani) यांची दुसरी कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याआधी 8 एप्रिल रोजी करीम मोरानी यांची पहिली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मोरानी यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
(हे वाचा-25 हजार कामगारांना मदत केल्यानंतर मालेगावच्या महिलांसाठी सलमान ठरला देवदूत)
चेन्नई एक्स्प्रेसचे निर्माते करीम मोरानी यांच्या मुली शझा आणि झोया मोरानी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. शझा मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेहून परतल्याचं समजत आहे तर झोया मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. शझाला नानावटी तर झोयाला कोकिलाबेन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. शझा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये या दोघींचे वडील करीम मोरानी हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं होतं. याबाबत स्वत: झोयाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार शझा आणि करीम या दोघांमध्ये कोणतीही लक्षण नसताना ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
(हे वाचा-भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न)
शझा आणि झोया या दोघींच्याही कोरोना टेस्ट नेगिटिव्ह आल्या आहेत मात्र आता करीम यांची दुसरी टेस्टही पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याबाबत चिंता वाढली आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे करीम यांचे वय 60 पेक्षा अधिक आहे आणि ते हार्ट पेशंट आहेत. याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. शझा आणि झोया यांना डिस्चार्ज मिळाला असून करीम यांच्यावर नानावटीमध्ये उपचार सुरू आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.