सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगची (Amrita Singh) मुलगी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सिनेमा रिलीज होऊनही सारानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक नवे अभिनेते तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत असताना बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं मात्र तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे.
सारानं सुशांत सिंग राजपूतसोबत 'केदारनाथ' या सिनेमातकाम केलं होतं. याच सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या.
पण नंतर आई अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली. अखेर सुशांत आणि सारा आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले मात्र त्यांच्यातली कटुता काही कमी झाली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहिरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.
रिपोर्टनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत एक्ससोबत काम करायचे नाही. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.
मागच्या वर्षी रिलीज झालेला सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील सुशांतच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं गेलं.
सारा अली खानचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आजकल' सिनेमा फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला. या सिनेमात तिनं कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.
साराचे आतापर्यंत तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. फार कमी वेळात साराने आपलं स्थान सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं. टॉप यंग अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.