सनीने केला गौप्यस्फोट, सांगितलं का सोडली पॉर्न इंडस्ट्री Sunny Leone | Pinch Show | Arbaaz Khan |

सनीने केला गौप्यस्फोट, सांगितलं का सोडली पॉर्न इंडस्ट्री Sunny Leone | Pinch Show | Arbaaz Khan |

Sunny Leone | Pinch Show | Arbaaz Khan | या एपिसोडमध्ये ट्रोलर्सना उत्तर देण्यासोबत सनीने आपल्या भूतकाळावर आणि घेतलेल्या निर्णयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

  • Share this:

मुंबई, 27 जून- अरबाज खान त्याच्या पिंच या शोमुळे अनेकदा चर्चेत येतो. नुकतीच त्याच्या शोमध्ये सनी लिओनीही गेली होती. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. पण सनी लिओनी येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा या शोकडे लागून राहिल्या होत्या. पिंच शोमध्ये सनीने फक्त आपल्या भूतकाळातील कामाबद्दलच चर्चा केली नाही तर सोशल मीडियावर तिला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं त्यालाही सडेतोड उत्तर दिलं.

या शोमध्ये सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना आलेल्या कमेंट वाचतात आणि त्यावर उत्तर देतात. तिला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. यात लिहिलं होतं की, ‘पॉर्नवर बंदी घालण्यात येणार असल्याचा अंदाज सनीला आधीच आला होता. त्यामुळेच तिने आपलं करिअरच बदललं का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना सनी म्हणाली की, ‘हो बरोबर आहे. मी दूरदर्शी आहे.’

जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत!

‘देशासाठी लढा.. जिंकण्यासाठीच लढा..’ सॅम मानेकशॉ यांचे हे 5 कोट एकदा वाचाच!

या एपिसोडमध्ये ट्रोलर्सना उत्तर देण्यासोबत सनीने आपल्या भूतकाळावर आणि घेतलेल्या निर्णयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दल बोलताना सनी म्हणाली की, तिने नेहमीच असे निर्णय घेतले जे त्या वेळेसाठी योग्य होते. त्यामुळे सनीने पॉर्नस्टार होण्याचा निर्णयही विचारपूर्वक पद्धतीनेच घेतल्याचं ती म्हणाली. तसेच त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडण्याचा निर्णयही तिने विचार करून घेतला होता.

सनीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की, ती कोणताही निर्णय घाईत घेत नाही. तसेच एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल तर ती निकटवर्तीयांशी त्याबद्दल बोलायलाही लाजत नाही. यातही ती पती डेनियलचा सल्ला नक्कीच घेते. सनीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती 'कोका कोला' नावाच्या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती बिहार, उत्तर प्रदेशमधील भाषा बोलताना दिसणार आहे. या सिनेमासाठी ती फार मेहनत घेत असून एक वेगळा प्रयोग करताना सनी यात दिसणार आहे.

बाहुबलीच्या 'देवसेने'चा झाला अपघात, थोडक्यात बचावला पाय

जेसीबीला केलं होतं ट्रेंड-

सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जेसीबी मशीनवर उभं राहिल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नेमकी याच कारणामुळे ती चक्क ट्रेंडमध्ये आली होती. या फोटोला कॅप्शन देत सनी म्हणाली की, तिला नवी सुरुवात केली पाहिजे. हे सर्व तेव्हा झालं जेव्हा एका वृत्त वाहिनीच्या सूत्रसंचालकाने सनी देओलच्या जागी सनी लिओनीचं नाव लोकसभा निवडणूकीच्या बातमीत वापरलं. सनीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर जेसीबीच्या पोस्ट यायला सुरुवात झाली. या सर्व पोस्ट एवढ्या व्हायरल झाल्या की स्वतः जेसीबी कंपनीने लोकांचे आभार मानले.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First Published: Jun 27, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading