चेन्नई, 27 जून- भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणाऱ्या बाहुबली सिनेमातील देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शर्माची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. स्वतः ती सोशल मीडियावर नसली तरी तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर होत असतात. पण नुकतीच तिच्याशी निगडीत एक वाईट बातमी समोर आली आहे. अनुष्का लवकरच सुरपस्टार चिरंजीवीसोबत ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनुष्काचा अपघात झाला आणि तिला दुखापत झाली. तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
KGF स्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट
मीडिया रिपोर्टनुसार सिनेमातील एक सीन शूट करताना अनुष्काच्या पायाला दुखापत झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. असं म्हटलं जातं की, अनुष्काला ही गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहोचवून त्यांना दुःखी करायचं नव्हतं. यामुळेच तिने कोणाला न सांगता याची ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरांनी तिला काही दिवस सक्त आराम करण्यास सांगितले आहे. असं म्हटलं जातं की अनुष्का लवकर बरी होऊन सेटवर येणार आहे.
‘या’ अभिनेत्यावर होता बलात्काराचा आरोप, आता सलमान खानच्या शोमध्ये घेणार एण्ट्री
‘सैरा नरसिंहा रेड्डी’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. चिरंजीवी यांच्या या सिनेमात अनुष्का पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. अनुष्काशिवाय या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.