जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत! Sam Manekshaw | Vicky Kaushal | Meghana Gulzar |

जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत! Sam Manekshaw | Vicky Kaushal | Meghana Gulzar |

Sam Manekshaw | Vicky Kaushal | Meghana Gulzar | सॅम यांची तेव्हाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही ते वाचू शकतील असं वाटत नव्हतं. डॉक्टरांनी शरीरातील त्या सातही गोळ्या काढल्या आणि नुकसान झालेल्या आतड्यांचा भागही काढून टाकला.

  • Share this:

मुंबई, 27 जून- भारतीय सेनेचे दमदार आणि कणखर जनरल सॅम मानेकशॉ यांच्यावर आता बायोपिक करण्यात येत आहे. मानेकशॉ हे भारतीय सेनेचे एक असे जनरल होते, जे त्यांच्या शौर्यासाठी आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जायचे. त्या काळात त्यांच्याबद्दल अनेक कथा रंगून सांगितल्या जायच्या. एवढंच नाही तर १९७१ भारत- पाकिस्तान युद्धात त्यांची अनन्यसाधारण भूमिका होती. पाकिस्तान सैन्याची कंबर मोडण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण हात होता. इंदिरा गांधी यांच्यासोबत रणनिती रचण्यापासून सेनेचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. मानेकशॉ यांच्या नेतृत्वामुळेच अवघ्या १४ दिवसांमध्ये पाकिस्तानच्या सेनेने हार पत्करली होती.

त्या सात गोळ्याही मानेकशॉ यांचं काही बिघडवू शकली नाही

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी मानेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ मध्ये झाला. पण त्यांच्ये दवळते मित्र- मैत्रिणी, त्यांच्या पत्नी आणि अनेक जवळची माणसं त्यांना सॅम या नावानेच हाक मारायचे. याशिवाय सॅम बहादुर या नावानेही त्यांना ओळखलं जायचं.

‘देशासाठी लढा.. जिंकण्यासाठीच लढा..’ सॅम मानेकशॉ यांचे हे 5 कोट एकदा वाचाच!

सॅम मानेकशॉ यांचं आत्मचरित्र लिहिणारे मेजर जनरल वीके सिंग यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महायुद्धात एका जपानच्या सैनिकाने आपल्या मशीनगन मधून सात गोळ्या झाडल्या होत्या. आतड्या, यकृत आणि मूत्रपिंडात या गोळ्या गेल्या होत्या. पण त्या गोळ्याही मानेकशॉ यांचं काहीच वाकडं करू शकली नाही. सॅम यांची तेव्हाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही ते वाचू शकतील असं वाटत नव्हतं. डॉक्टरांनी शरीरातील त्या सातही गोळ्या काढल्या आणि नुकसान झालेल्या आतड्यांचा भागही काढून टाकला. तातडीने ऑपरेशन झाल्याने सॅम यांचा जीव वाचला. यानंतर त्यांना मांडले नेण्यात आलं. तिथून रंगून आणि मग भारतात आणलं गेलं.

रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

देशाचे दुसरे फिल्ड मार्शल झाले-

पंजाबच्या अमृतसर येथे जन्मलेल्या सॅम मानेकशॉ यांची निवड १९३२ मधअये ब्रिटीशांद्वारे स्थापित झालेल्या इंडियन मिलिट्री अकादमीमध्ये झाली. ते अकादमीच्या पहिल्या बॅचमधील सदस्य होते. नोकरीच्या ३७ वर्षांनंतर त्यांना स्वतंत्र्य भारताच्या सेनेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९६९ मध्ये त्यांची सेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. १९७१ च्या युद्धात अनन्यसाधारण नेतृत्वामुळे ते देशाचे हिरो झाले. १९७३ मध्ये निवृत्त होण्याच्या एक रात्र आधी त्यांची फील्ड मार्शल या पदावर नियुक्ती करण्यात आली. सॅम देशाचे दुसरे असे व्यक्ती होते ज फील्ड मार्शल या पदापर्यंत पोहोचले होते. याआधी केएम करिअप्पा हे फील्ड मार्शल होते.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 27, 2019, 2:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading