जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर...' सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला

'शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर...' सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला

'शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर...' सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला

या व्हिडीओमध्ये सनी लैंगिक शोषणाबद्दल बोलताना दिसत आहे. प्रत्येकानं हा व्हिडीओ एकदा पाहायलाच हवा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ते सोशल मीडियावर फक्त तिचे फोटोच पोस्ट करत नाही तर अनेकदा सामाजिक मुद्द्यांवरही बोलताना दिसते. सध्या सनीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सनी लैंगिक शोषणाबद्दल बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीला तिच्या ऑफिसमधील वरिष्ठ सहकारी त्रास देताना दिसतो. ती मुलगी बऱ्याच वेळी त्याला टाळते मात्र जेव्हा ही गोष्ट हाताबाहेर जात असल्याचं तिला समजतं तेव्हा ती तिची बॉस असेलल्या सनी लिओनीकडे त्याची तक्रार करते. त्यानंतर त्या दोघी मिळून या सहकऱ्याला कसा धडा शिकवतात. हे पाहण्यासाठी प्रत्येकानं हा व्हिडीओ पाहायलाच हवा. VIDEO : माधुरीच्या ‘एक-दो-तीन…‘वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा…

जाहिरात

हा व्हिडीओ शेअर करताना सनीनं लिहिलं, कामाच्या ठिकाणी जर तुमचं लैंगिक शोषण होत असेल तर गप्प राहू नका. याविषयी बोलणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना योग्य वेळीच आणि त्यांच्याच भाषेत उत्तर देणं गरजेच आहे. हा व्हिडीओ सनीची आगामी वेब सीरिज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स 2’ असल्याचं बोललं जात आहे. या वेब सीरिजमध्ये ती पॅरानॉर्मल एक्सपर्टच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयनं बायकोला दिलेल्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO सनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं सनी लिओनी सध्या एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला होस्ट करताना दिसत आहे. करिअरची सुरुवात अडल्ट फिल्मपासून करणाऱ्या सनीनं 2012 मध्ये पूजा भटच्या जिस्म 2 मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ती बऱ्याच आयटम सॉन्गमध्ये दिसली. ‘देश पेटलाय आणि हिचं बघा काय चाललंय’, दिशाच्या BIKINI PHOTOवर भडकले युजर्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात