जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : माधुरीच्या 'एक-दो-तीन...'वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा...

VIDEO : माधुरीच्या 'एक-दो-तीन...'वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा...

VIDEO : माधुरीच्या 'एक-दो-तीन...'वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा...

माधुरी दीक्षितच्या एव्हरग्रीन डान्स नंबरवर सारा अली खानने दमदार नृत्य केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर : सध्या तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनलेली अभिनेत्री सारा अली खान एव्हरग्रीन माधुरी दीक्षितच्या गाण्यावर अशी काही नाचली की, तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले. एका पुरस्कार सोहळ्यात साराने माधुरीच्या लोकप्रिय तेजाब चित्रपटातल्या एक, दोन, तीन… गाण्यावर डान्स केला. माधुरी दीक्षितच्या नृत्याला आपल्या अंगात भिनवून सारा अली खान धमाल नाचली. तिला या सोहळ्यात रायजिंग स्टार अवॉर्डही मिळालं. Nickelodeon Kids’ Choice Awards 2019 या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिळवण्यासाठी तगडे स्पर्धक होते. सारा अली खानबरोबरच या सोहळ्यात कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराना, क्रिती सॅनन आणि भूमी पेडणेकरही सहभागी झाले होते.

जाहिरात

सारा अली खानने या कार्यक्रमानंतर आपल्याला मिळालेल्या अवॉर्डचा फोटोही शेअर केला. Instagram वर शेअर केलेल्या या फोटोबरोबर छान कॅप्शनही साराने लिहिली आहे.

हा पुरस्कार मिळाल्यावर इतर कुठल्या कँडी किंवा गाड्यांची काय गरज… असं म्हणत तिने यमक जुळवत चक्क इंग्रजीतून कविता केली आहे. तिच्या या मिश्कील पोस्टवरही चाहते खुश झाले आहेत. ——————— अन्य मनोरंजन वृत्त अक्षयनं बायकोला दिलेल्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO ‘देश पेटलाय आणि हिचं बघा काय चाललंय’, दिशाच्या BIKINI PHOTOवर भडकले युजर्स दीपिका आहे करोडोंची मालकीण, सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात