मुंबई, 09 नोव्हेंबर: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सनीचे असंख्य फोटो आहेत. अनेक जणांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर सनीचा फोटो दिसतात. तर अनेक पोस्टर्सवर सनी दिसते. पण कर्नाटकात सनीचा फोटो पाहून सगळ्यांच भुवया उंचावल्या आहेत. शिक्षण भरतीच्या हॉलतिकिटावर सनी लिओनीचा फोटो आढळला आहे. साधा सुधा नाही तर सनीचा बोल्ड फोटो हॉल तिकिटावर पाहून सगळेच चक्रावून गेले आहेत. उमेदवाराच्या हॉल तिकिटाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उमेदवाराच्या हॉलतिकिटाचा हा प्रकार समोर येतात शिक्षण विभागानं चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार कर्नाटकात घडला आहे. कर्नाटक काँग्रेसच्या सोशल मीडिया चेअरपर्सन बीआर नायडू यांनी हॉल तिकिटाच्या फोटोचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला होता. शिक्षण विभागाच्या उमेदवारानं स्वत:चा फोटो हॉल तिकिटावर लावण्याऐवजी अडल्ट स्टॉरचा फोटो लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विधानसभेत ब्लू फिल्म लावणाऱ्या पक्षाकडून काय अपेक्षा करायच्या अशी टिका देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे. हेही वाचा - Rashmika Mandanna: सततच्या ट्रोलिंगमुळे दुखावली रश्मिका; पोस्ट लिहीत म्हणाली, ‘इतकेदिवस शांत होते पण…’ कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी काँग्रेसला प्रतिक्रिया देताना म्हटलं, परिक्षेचा फॉर्म भरताना उमेदवाराचा फोटो लावला जातो. सिस्टिम तोच फोटो हॉल तिकिटावर लावते. विभागाकडून याबाबत कोणतीही चूक होत नाही. सनी निओनीचा फोटो असलेल्या हॉल तिकिटाची उमेदवार ही एक मुलगी आहे. तिच्या नवऱ्याच्या मित्रानं तिच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता.
याआधी देखील असा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. 2020मध्ये बीए सेकंड इअर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या फॉर्मवर इमराम हाशमी आणि सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला होता. हा प्रकार भीमराव आंबेडकर बिहार विश्वविद्यालयात घडला होता. विद्यार्थ्याच्या आई वडिलाच्या जागी सनी लिओनी आणि इमराम हाशमीचा फोटो लागला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खूप चर्चा झाल्या होत्या. स्वत: इमरान हाशमीनं देखील ‘खरं सांगतो हा माझा मुलगा नाहीये’, अशी मजेशीर कमेंट दिली होती.