Home /News /entertainment /

…आणि क्षणार्धात ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे सनी लिओनी सुद्धा झाली अदृश्य, हा VIDEO एकदा पाहाच

…आणि क्षणार्धात ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे सनी लिओनी सुद्धा झाली अदृश्य, हा VIDEO एकदा पाहाच

सनी लिओनीचा 'मिस्टर इंडिया'प्रमाणे गायब होतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 04 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अडल्ट फिल्म इंडस्ट्री ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय आहे. नेहमीच ती चाहत्यांसाठी काही तरी वेगळं आणि नवं देण्याचा प्रयत्न करत असते. आताही तिनं असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती मिस्टर इंडियाप्रमाणे गायब झालेली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. ज्यात ती तिच्याच हटके स्टाइलमध्ये मिस्टर इंडियाप्रमाणे गायब होताना दिसत आहे. फक्त यात एवढाच फरक आहे की असं गायब होण्यासाठी तिनं कोणत्याही घड्याळाचा वापर केलेला नाही. तर ती एक रिंगचा वापर करुन गायब होताना दिसत आहे. या तिच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. 'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', रश्मी देसाईचा गौप्यस्फोट
  सनीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, आता मला गायब होण्यासाठी कोणत्याही घड्याळाची गरज नाही. सनीचा हा टिकटॉक व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. ज्यात तिनं या अ‍ॅपचा वापर करुन असा व्हिडीओ तयार केला आहे. सनीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
  मागच्या काही दिवसांपासून मिस्टर इंडिया सिनेमाची जोरदर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी त्यांच्या ट्विटरवरुन घोषणा केली होती की, ते लवकरच मिस्टर इंडियाची ट्रिलॉजी तयार करणार आहेत. यानंतर अनिल कपूर यांनी मुलगी सोनम कपूर हिनं सोशल मीडियावर वरुन याबाबत माझ्या वडीलांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही असं म्हणत यावर आक्षेप घेतला होता. तसेच अभिनेता शेखर कपूर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो VIRAL, कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोला टक्कर सनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिनं 2012 मध्ये रिलीज 'जिस्म 2' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग केले. मागच्या वर्षी रिलीज झालेल्या 'सनी लिओनी : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या बायोपिक सीरिजमधून सनीनं तिचा जीवनप्रवास सर्वांसमोर आणला आणि तिच्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टीकोणच बदलला. ती शेवटची 'रागिनी एमएमएस रिटर्न्स सीझन 2' मध्ये दिसली होती. लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा 'कोका कोला' आणि 'वीरमादेवी' या साउथ सिनेमात दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया-रणबीरचा रोमँटिक सीन लीक, VIDEO झाला व्हायरल
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sunny Leone

  पुढील बातम्या