...म्हणून सनी देओल 16 वर्ष शाहरुख खानशी बोलत नव्हता

...म्हणून सनी देओल 16 वर्ष शाहरुख खानशी बोलत नव्हता

तेव्हा मी रागाने माझे हात जीन्सच्या खिशात टाकले. तेव्हा मला इतका राग आला होता की जीन्सचा खिसा कधी फाटला ते मला कळलंच नाही.

  • Share this:

मुंबई, 22 जून- बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात अनेक वर्ष विस्तवही जात नव्हता. डर सिनेमादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सनीने फक्त शाहरुखसोबतच बोलणं टाळलं असं नाही तर त्याने यश चोप्रासोबत काम करणंही सोडलं आणि १६ वर्ष तो शाहरुख खानशी एकही शब्द बोलला नाही. इंडिया टीव्हीशी बोलताना सनीने डर सिनेमाच्या सेटवरील आपल्या रागाचा उल्लेख केला. सनी म्हणाला की, 'सिनेमात मी कमांडोच्या भूमिकेत होतो आणि शाहरुखला मला चाकू मारायची होती. मी एवढा फिट होतो तर कोणी (शाहरुख खान) मला कसं चाकू मारेल.'

हेही वाचा- जान्हवीच्या कंबरेला हाडच नाही, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पटेल

'याच गोष्टीचा मला राग होता. यशजी फार मोठे होते. मी त्यांना काही बोलू शकत नव्हतो. तेव्हा मी रागाने माझे हात जीन्सच्या खिशात टाकले. तेव्हा मला इतका राग आला होता की जीन्सचा खिसा कधी फाटला ते मला कळलंच नाही.' जेव्हा सनीला तो शाहरुखशी १६ वर्ष का बोलला नाही याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'असं काही नाहीये, की मी त्याच्याशी बोललो नाही. पण माहीत नाही का पण जास्त पार्टी किंवा कार्यक्रमांना जात नाही. कोणाशी जास्त बोलत नाही. आम्ही दोघं एकत्र असे कधी भेटलोच नाही तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी सार्वजनिक ठिकाणीही फार कमी जातो. मी अनेकांसोबत एकत्र काम करतो पण कोणाशी जास्त बोलत नाही.'

हेही वाचा- भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

जेव्हा सनीला डर सिनेमाच्या सेटवर शाहरुखपासून दिग्दर्शकांपर्यंत सगळेच तुला घाबरायचे का असा प्रश्न विचारला असता सनी देओल म्हणाला की, 'त्यांना माझ्याबद्दल भीती वाटत असेल कारण त्यांच्या मनात खोट असेल. यानंतर सनी जोरजोरात हसायला लागला.' सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर  नुकतंच सनीने भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. गुरदासपुरमधून तो खासदार म्हणून निवडून आला होता. तर शाहरुख खान शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

हेही वाचा- VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा

VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

First Published: Jun 22, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading