जान्हवीच्या कंबरेला हाडच नाही, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पटेल

जान्हवीच्या कंबरेला हाडच नाही, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पटेल

व्हिडिओमध्ये जान्हवी स्टुडिओमध्ये डान्स मूव्ह करताना दिसत आहे. डान्स करताना जान्हवीने गुलाबी रंगाचा टाइट टॉप आणि पांढऱ्या रंगाची हॉट पॅन्ट घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जून- श्रीदेवीची मोठी मुलही आणि धडक अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवीचे जिम फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा ती अप्रतिम डान्ससाठी चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी बेली डान्सच्या मूव्ह करताना दिसत आहे. विशेष म्हणजे जान्हवी बेली डान्स कोणत्या बॉलिवूड गाण्यावर नाही तर रिअलिटी शो डान्स दिवानेच्या टायटल ट्रॅकवर करत आहे. जान्हवीला बेली डान्स करण्याचं चॅलेंज धडक सिनेमाचा दिग्दर्शक शशांक खेताने दिलं. जान्हवीचा हा बेली डान्स कोणालाही तिच्या प्रेमात पाडायला पुरेसा आहे.

हेही वाचा- अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

 

View this post on Instagram

 

#janhvikapoor belly dancing moves 🔥🔥🔥🔥

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

हेही वाचा- भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट

व्हिडिओमध्ये जान्हवी स्टुडिओमध्ये डान्स मूव्ह करताना दिसत आहे. डान्स करताना जान्हवीने गुलाबी रंगाचा टाइट टॉप आणि पांढऱ्या रंगाची हॉट पॅन्ट घातली आहे. जान्हवीने पोनी टेलही बांधली आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी फार साध्या लुकमध्ये दिसत आहे. जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती करण जोहरच्या तख्त सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग, आलिया भट्ट, करिना कपूर आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असणा आहेत.

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading