मुंबई, 17 जून- बॉलिवूड अभिनेता सोहेल खानने १६ जूनला आपल्या मुलाचा योहान खानचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. सोहेलने मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीत पूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. यात सलमान खान, अरबाज खान, सलीम खान, सलमा खान, हेलेन, अरबाजचा मुलगा अरहान उपस्थित होते. खान कुटुंबाशिवाय अमृता अरोराचं कुटुंबही यावेळी पार्टीला उपस्थित होतं. भारत सिनेमातील सलमानचा सहकलाकार सुनील ग्रोवरही या पार्टीला आला होता. हेही वाचा-
भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट
एवढेच सेलिब्रिटी योहानच्या बर्थडे पार्टीला उपस्थित होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं नाहीये. अरमान मलिक, डेजी शहा, शेरा या मंडळींनीही उपस्थिती लावत धम्माल केली होती. या पार्टीचा एक मजेशीर व्हिडिओ सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान, सोहेल आणि त्याचा मुलगा योहान बीन बॅगसोबत स्टंट करताना दिसत आहे. या तिघांनी बिन बॅगसोबत नक्की काय स्टंट केला हे जर आम्ही सांगायला गेलो तर समजावणं थोडं अवघड जाईल. त्यापेक्षा तुम्हीच हा व्हिडिओ पाहा. व्हिडिओशिवाय योहानचे दोन्ही काका त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत पार्टीला आल्यामुळे चर्चेत राहिले होते.
हेही वाचा-
अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द
सलमान त्याची कथित प्रेयसी लुलियासोबत एका गाडीतून आला होता. तर अरबाज त्याची प्रेयसी जॉर्जियासोबत दिसला. सलमानने अजूनपर्यंत लुलियासोबतचं त्याचं नातं स्पष्ट केलेलं नाही. पण अरबाज प्रत्येक ठिकाणी जॉर्जियासोबत दिसतो. दोघांनी अधिकृतरित्या नात्यात असल्याचंही मान्य केलं आहे. हेही वाचा-
VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा
नुकतीच जॉर्जिया खान कुटुंबासोबत बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये दिसली होती. या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात जॉर्जियाला अरबाजची बहीण अर्पिताने ओढणी नीट करण्याचा सल्ला दिला होता. अर्पिताच्या सांगण्यावरून जॉर्जियाने ओढणी नीट केलीही होती, यावरून दोघांमध्ये चांगलं बॉण्डिंग असल्याचं दिसलं होतं. रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या