नवी दिल्ली, 17 जून- रविवारी मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार मॅन्चेस्टरमध्ये गेले होते. सैफ अली खानने भारतीय क्रिकेट टीमची जर्सी घातली होती. तर रणवीर सिंग स्टेडिअममध्ये भारताला जोशात पाठिंबा देताना दिसला. रणवीरचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रणवीर भारतीय संघ सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीचं अभिनंदन करताना दिसत आहे.
📷| Ranveer Singh at old Trafford , today ♥️ #INDvPAK #CWC2019 pic.twitter.com/Ajkqehzkdq
— Ranveer Singh TBT (@Ranveertbt) June 16, 2019
भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट रणवीर सिंगच्या फॅन क्लबने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर सामना संपल्यानंतर मैदानात जाऊन विराटला मिठी मारताना दिसत आहे. सामना सुरू होण्याच्याआधीपासूनच रणवीरचा जोश सगळे पाहत होते. जेव्हा भारताने सामना जिंकला तेव्हा तर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
📷| Ranveer Singh with @hardikpandya7 After #INDvPAK Match at old Trafford , today ♥️ #CWC2019 #IndVsPAk pic.twitter.com/mKG3CGiA0L
— Ranveer Singh TBT (@Ranveertbt) June 17, 2019
अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द विराटशिवाय रणवीरचे अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. यात तो विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सुनील गावस्कर यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. रणवीर सिंग आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर दोघं शम्मी कपूर यांच्या ‘जरा पास आओ तो चैन आ जाए’ गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या