• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘100 दिवस खोलीत बंद करून तुडवा’; सुनिल पालने उडवली राज कुंद्राची खिल्ली

‘100 दिवस खोलीत बंद करून तुडवा’; सुनिल पालने उडवली राज कुंद्राची खिल्ली

राज हॉटशॉट नामक एका अॅपसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे.

 • Share this:
  मुंबई 24 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका अॅपसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे. (Raj Kundra Pornography case) दरम्यान या अश्लील व्हिडीओ प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता सुनिल पाल (Sunil Pal) याने प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेब सीरिज बनवणाऱ्यांना एका खुलीत बंद करून चांगलाच चोप द्या असा सल्ला त्याने पोलिसांना दिली आहे. “चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नाही अन् असे व्हिडीओ पाहण्यासाठी लोक हजारो रूपये खर्च करतात. वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नपटांचा व्यवसाय सुरु आहे. सेन्सरशीप नसल्याचा गैरफायदा घेत ही मंडळी समाजात अश्लीलता पसरवत आहेत. अशा लोकांना एका खोलीत बंद करा आणि 100 दिवस आधी चांगला चोप द्या. मग त्यांच्यावर इतरत्र कारवाई करा. हे लोक कोट्यवधी रुपयांची कमाई करतात अन् विदेशात पळतात. परंतु आपली तरूण पिढी मात्र या लोकांमुळे वाया जात आहे. त्यांना चांगले चित्रपट म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय? उत्तम अभिनय म्हणजे काय असतो? हे देखील कळत नाही. दोर चार अश्लील दृश्य पाहण्यासाठी ते हजारोंचे सबस्क्रिप्शन घेतात. हे त्वरित थांबवायला हवं. राज कुंद्राच्या अटकेमुळे या सर्वांना चांगला चाप बसेल अशी अपेक्षा आहे.” अशी प्रतिक्रिया सुनिल पालने दिली. राज कुंद्राला बसणार ED चा दणका; परदेशातील आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published: