मुंबई 24 जुलै: पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची (Raj Kundra) कसून चौकशी केली जात आहे. दररोज नवनवे खुलासे होत असल्यामुळे राजच्या अडचणींत वाढ होत आहे. नुकतीच क्राईम ब्रांचने त्याच्या आफिस आणि घरात धाड टाकली. (Mumbai Crime branch raids Shilpa Shettys bungalow) त्यानंतर आता त्याचे बँक अकाऊंट देखील तपासून पाहिले जात आहेत. या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) उडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ईडी देखील राजवर कारवाई करणार आहे.
अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी
राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करत होता. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली अशी शंका ईडीला आहे. त्यामुळे FEMA अंतर्गत ED आपला तपास सुरु करणार आहे. त्यामुळे लवकरच राजचे परदेशातील आर्थिक उलाढाली देखील जगासमोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; भरत जाधव मागतोय मदतीचा हात
राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस?
हॉटशॉट अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Case ED raids, Crime, Raj kundra, Shilpa shetty