• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी

राज कुंद्राची पोलखोल करणाऱ्या मॉडेलला जीवे मारण्याची धमकी; पोलीस तक्रार करत मागितली मदत

  • Share this:
    मुंबई 24 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका अॅपसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे. (Raj Kundra Pornography case) दरम्यान अशा अश्लील व्हिडीओंसाठी मॉडेल, अभिनेत्री सागरिका शोना सुमन (Sagarika Shona Suman) हिला देखील देखील विचारण्यात आलं होतं. तिने स्वत: पुढे येत राजची पोलखोल केली. मात्र यामुळे तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या प्रकरणी तिने आता पोलीस तक्रार देखील केली आहे. तिला फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही जण तर फोन करून देखील धमक्या देतायेत. धमक्या देणारे बहुतांश अकाऊंट फेक आहेत. किंवा दुसऱ्याच नावाने वापरले जात आहेत. जर तिने राज विरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही. तर तिला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते अशा धमक्या मिळत असल्याचा दावा सागरिकाने केला आहे. शिवाय या मंडळींविरोधात आता तिने कायदेशीररित्या पोलीस तक्रार दाखल केली आहे. राज कुंद्रा प्रकरणात सागरिका साक्ष देखील देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! चौकशीदरम्यान काईम ब्रांचने विचारले हे 10 प्रश्न राजला कुंद्राला अटक होताच सागरिका माध्यमांसमोर आली अन् तिने या प्रकरणी मोठे खुलासे केले. राज पॉर्न चित्रपटांची निर्मिती करतो. तिला देखील अशा चित्रपटांची ऑफर मिळाली होती. तिला ऑनलाईन ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. शिवाय नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओंची देखील मागणी करण्यात आली होती. अर्थात तिने यासाठी नकार दिला त्यावेळी राज कुंद्रा याने सागरिकासोबत फोनवर संभाषण केलं होतं. अत्यंत अश्लील शब्दात तो तिच्याशी बोलत होता. असे खळबळजनक दावे तिने केले आहेत. शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video राज विरोधात पुरावे शोधण्यासाठी सागरिका पोलिसांना मदत करण्यास तयार आहे. “मला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावं. जर मला हे इतके मोठे रॅकेट आहे याचा अंदाज आला असता तर त्यांचे कॉल आणि व्हिडीओ मी आधीच रेकॉर्ड करून ठेवले असते. पण हरकत नाही वॉट्स अॅपच्या डेटाबेसमध्ये नक्कीच ते सापडतील. या रॅकेटबद्दल शिल्पा शेट्टीला देखील नक्कीच माहित आहे. कारण फोनवर बोलताना ते तिच्याबद्दलही बोलत होते.” असा दावा देखील सागरिकाने केला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: