मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Sundara Manamadhe Bharli' मधील अभ्याचं ते बिंग फुटलं ; समोर आला पडद्यामागील खरा Video

'Sundara Manamadhe Bharli' मधील अभ्याचं ते बिंग फुटलं ; समोर आला पडद्यामागील खरा Video

सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या  मालिकेतील शर्यतिची जेवढी चर्चा झाली तितकीच ही शर्यत चित्रीत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या मालिकेतील शर्यतिची जेवढी चर्चा झाली तितकीच ही शर्यत चित्रीत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या मालिकेतील शर्यतिची जेवढी चर्चा झाली तितकीच ही शर्यत चित्रीत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 23 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही सध्या एका नव्या वळणावर आहे. अभिमन्यू आणि लतिकाच्या (akshaya naik) या प्रवासामध्ये (sundara manamadhe bharli latest update) अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले आणि आता प्रेक्षकांना दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट बघायला मिळते (sundara manamadhe bharali latest episode )आहे. नुकतीच मालिकेत शर्यत पार पडली आणि लतिकाने ही शर्यत जिंकली तरी आहेच पण अभ्याच्या प्रेमाची शर्यत देखील जिंकली. या शर्यतिची जेवढी चर्चा झाली तितकीच ही शर्यत चित्रीत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये या शर्यतीच्या पडद्यामागच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यावेळी अभ्या शर्यतीवेळी अनवानी नाही तर बेअर शूजचा वापर केल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे अभ्याचे हे बिंग सर्वांसमोर फुटलं आहे.

कर्लस मराठीने त्यांच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुंदरा मनामध्ये भरली या मालितकेतील शर्यत कशापद्धतीने शुट करण्यात आली. कलाकारांनी व पडद्यामागच्या लोकांच्या मदतीने, कष्टाने ही शर्यत कशी शुट केली हे सांगण्यात आले आहे. ही मानाची शर्यत सुरू झाल्यानंतर अभ्याच्ये शूज गायब होतात मग काय अभ्या रिकाम्या पायांनीचे शर्यतीत भाग घेतो. यावेळी त्याने वापरलेले शूज ..म्हणजे चप्पल ..यासाठी त्याने कोणती युक्ती वापरली आहे हे देखील सांगितले आहे.या सर्वाचा खुलासा यामध्ये करण्यात आला आला आहे.  अशाप्रकारच्या चप्पलचा वापर करून अभ्या या सर्यतीत धावला होता. मालिकेत जरी तो अनवानी पायी धावला असला तरी त्याने स्कीन कलरच्या बेअर फूटचा वापर केला होत हे त्याने सांगितलं आहे.

तसेच पडद्यामागच्या टीमने कलाकारांनी टाळ्या वाजवून कशाप्रकारे प्रोत्साहित करण्यात आले याची झलक दाखवण्यात आली आहे. उन्हात कशाप्रकारे कलाकारांनी ही मानाची शर्यत केली हे आपण पाहिलेच पण ही शर्यत यशस्वी करण्यासाठी काही पडद्यामागे देखील हात होते हेच यातून दिसते आहे.

वाचा,Radhe Shyam Teaser: प्रभासच्या वाढदिवसाला मेकर्सनी दिलं मोठं गिफ्ट;रिलीज केला...

.सगळ्यांना अभिमन्यू आता शर्यतीत हरला असं वाटतं असतानाच लतिका जोखड घेऊन शर्यतीमध्ये भाग घेतला आणि तिने ही शर्यत जिंकली. यानंतर लतिकाची गावातून मिरवणूक काढण्याल आली आहे. लतिकाने ही शर्यत जिंकून स्वत:ला सिद्ध केले आहे. अगडबम लतिकाने अभ्यासाठी वजनदार काम केले आहे. समजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण होता ते देखील बदलला आहे.

वाचा,कृत्रिम पायामुळे अभिनेत्रीला सहन करावा लागला मनस्ताप शेवटी CISF चा माफीनामा

दरम्यान, लतिकाने स्पर्धा जिंकून दौलतची फजिती केल्यामुळे दौलत रागाने पेटून उठला आहे. त्यामुळेच याचा बदला तो आता अभिमन्युच्या कुटुंबासोबत घेणार आहे. या सगळ्या प्रकरणात अभिमन्युच्या आईला मारहाण होणार आहे. परंतु, हे नेमकं कसं आणि कशा पद्धतीने होते हे सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.

First published:

Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment, Tv serial