• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Radhe Shyam Teaser: प्रभासच्या वाढदिवसाला मेकर्सनी दिलं मोठं गिफ्ट;रिलीज केला चित्रपटाचा नवा टीजर

Radhe Shyam Teaser: प्रभासच्या वाढदिवसाला मेकर्सनी दिलं मोठं गिफ्ट;रिलीज केला चित्रपटाचा नवा टीजर

साऊथ सुपरस्टार(South Actor) प्रभास (Prabhas) आज त्याचा 42 वा वाढदिवस(Birthday Today) साजरा करत आहे.

 • Share this:
  मुंबई,23ऑक्टोबर- साऊथ सुपरस्टार(South Actor) प्रभास (Prabhas) आज त्याचा 42 वा वाढदिवस(Birthday Today) साजरा करत आहे. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी 'राधे श्याम'(Radhe Shyam New Teaser) च्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केला आहे. याद्वारे निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना खास मेजवानीच दिली आहे. टीझरमध्ये प्रभासचा विक्रमादित्य अवतार निर्मात्यांनी उघड केला आहे. 'राधे श्याम' 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त पूजा हेगडेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट एक पिरीयड रोमँटिक-ड्रामा आहे. हा बहुभाषिक चित्रपट आहे. जो हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करत आहेत, तर त्यांच्या निर्मात्यांमध्ये वंशी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पालपती आणि भूषण कुमार यांचा समावेश आहे. प्रभासच्या कारकिर्दीतील हा 20 वा चित्रपट आहे. (हे वाचा:BIG NEWS:26 वर्षांनंतर नव्या रूपात दिसणार'DDLJ'; आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन) 'राधे-श्याम' हा चित्रपट या प्रेमकथेवर अधारित असून विविध भारतीय भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शुटींग गेल्या दोन वर्षांपासून सुरू होतं. 2020 सालच्या मे महिन्यातच या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झालं होतं. पण देशात कोरोना विषाणूने घातलेल्या विळख्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं. त्यांनतर 'Valentine's Day ला या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासूनच चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्यांनतर आता तब्बल ९ महिन्यांनी या चित्रपटाचा नवा टीजर समोर आला आहे. (हे वाचा:काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य) राधे-श्याम' ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात बाहुबली स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूरसहीत इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास या चित्रपटात एका हस्तरेखातज्ञ्ची भूमिका साकारत आहे, तर पूजा हेगडे राजकुमारीच्या भूमिकेत दिसू शकते.या चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबाद व्यतिरिक्त युरोपमधील अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. याशिवाय या चित्रपटातील काही दृश्यांचं चित्रीकरण जॉर्जियात करण्यात आलं आहे
  Published by:Aiman Desai
  First published: