advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्रीला प्रत्येकवेळी एअरपोर्टवर काढायला सांगतात जयपूर फूट; शेवटी CISF ने मागितली माफी

अभिनेत्रीला प्रत्येकवेळी एअरपोर्टवर काढायला सांगतात जयपूर फूट; शेवटी CISF ने मागितली माफी

प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudhaa Chandran) यांची विमानतळावर कृत्रिम पाय (Prosthetic Limb) काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शुक्रवारी माफी मागितली आहे.

01
प्रसिद्ध नृत्यांगणा आणि नर्तकी आणि अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudhaa Chandran) यांची विमानतळावर कृत्रिम पाय (Prosthetic Limb) काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शुक्रवारी, 22 ऑक्टोबर रोजी माफी मागितली आहे.

02
 ‘सीआयएसएफ’ने ट्विटरद्वारे माफीनामा सादर केला आहे.

03
. सुधा चंद्रन यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला क्षमा करावी. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच नियमानुसार सुरक्षा तपासणीदरम्यान कृत्रिम अवयव काढून तपासणी करणे आवश्यक असते. परंतु महिला सुरक्षा अधिकाऱ्याने सुधा चंद्रन यांच्या बाबतीत हा नियम का लक्षात घेतला नाही, याची चौकशी करण्यात येईल, असे ‘सीआयएसएफ’ने म्हटले आहे.

04
अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी सोशल मीडीयामध्ये व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आवाहन केले होते.

05
दरम्यान 56 वर्षीय सुधा चंद्रन यांना विमानतळावर सिक्युरिटी चेकच्या प्रत्येक वेळेस कृत्रिम पाय काढून दाखवण्यास सांगितलं जातं.

06
त्यामुळे संतप्त सुधा चंद्रन यांनी वयोवृद्धांप्रमाणेच आपाल्यालाही एखादं कार्ड मिळावं अशी मागणी केली होती. तसेच अशाप्रकारे मिळणारी वागणूक किती योग्य आहे? असा सवालही त्यांनी विचारला होता.

07
सुधा चंद्रन यांच्या बाबतीतील हा प्रकार गुरुवारी मुंबई विमानतळावर घडला होता. अपघातात पाय गमावल्यानंतर सुधा चंद्रन यांनी कृत्रिम पायाच्या साह्याने भरत नाट्यम सादर करण्याचा इतिहास रचला आहे.

08
सुधा चंद्रन ह्या कित्येक दशकापासून कला सृष्टीत आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास समर्थ ठरल्या आहेत.

09
मयुरी, तेरा इन्तजार, नागीण, कहीं किसी रोज, शका लका बूमबुम, हिना, चष्मे बद्दूर, विष्णू पुराण, तुम बिन जाऊं कहा, जमीन से आसमान तक यासारख्या अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी तगड्या भूमिका साकारल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • प्रसिद्ध नृत्यांगणा आणि नर्तकी आणि अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudhaa Chandran) यांची विमानतळावर कृत्रिम पाय (Prosthetic Limb) काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शुक्रवारी, 22 ऑक्टोबर रोजी माफी मागितली आहे.

    MORE
    GALLERIES