मुंबई, 22 फेब्रुवारी : कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना फॅन्सची पसंती मिळत असते. दरम्यान कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं हा ट्रेंड झाला आहे. अगदी राज कपूर ते आलिया पर्यंत मराठी हिंदी अशा अनेक कलाकारांचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. बालपणीचे कलाकार आणि आताचे ते यात खूप फरक पाहायला मिळतो. अनेकदा त्या कलाकारांना ओळखणंही कठीण होतं. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या फोटोतील कलाकाराला ओळखणं थोडं कठीण आहे पण तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता. तुम्ही जर मराठी मालिका पाहात असाल तर फोटोतील या कलाकाराला तुम्ही नक्कीच ओळखू शकता. त्याआधी सागांयची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो पाहून तुम्हाला असं वाटेल की ही अभिनेत्री आहे तर नाही फोटोत दिसणारा तो अभिनेता आहे. अभिनेत्यानं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीचा वेश केला आहे. हा अभिनेता सध्या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेत काम करत आहे. दररोज त्यांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. हेही वाचा - अभिनेता कैलास वाघमारे रोमँटिक भूमिका! नव्या सिनेमाचं पोस्टर लाँच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील सगळीच पात्र अफलातून आहेत. लतिका आणि तिची मुलगी सध्या मालिकेत धम्माल करत आहेत. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन देखील त्यांचे चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळतेय. त्याचप्रमाणे लतिच्या घरातील व्यक्ती देखील जबरदस्त आहेत. या फोटोत दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून लतिकाचे बापू म्हणजेच अभिनेते उमेश दामले आहेत. उमेश यांची नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. अभिनेते उमेश दामले यांनी पेहचान कौन? म्हणत त्यांचा हा जुना फोटो शेअर केला. त्यांचा हा फोटो सन 1993-94मधील आहेत. चिं.वि. जोग आंतर बँक एकांकिका स्पर्धेत त्यांनी हे पात्र साकारलं होतं. ना तुझकू, ना मुझकू असं त्या एकांकिकेचं नाव होतं. या एकांकिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.
उमेश दामले सध्या सुंदर मनामध्ये भरली मालिकेत काम करत आहेत.त्यांनी याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलंय. जावई विकत घेणे आहे मालिकेत त्यांनी काम केलं आहे. त्याचप्रमाणे मुळशी पॅटर्न, मितवा, पार्टी, रणांगण, मोगरा फुलला सारख्या सिनेमातही त्यांनी काम केलं आहे.