जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता कैलास वाघमारे रोमँटिक भूमिका! नव्या सिनेमाचं पोस्टर लाँच

अभिनेता कैलास वाघमारे रोमँटिक भूमिका! नव्या सिनेमाचं पोस्टर लाँच

kailash waghmare

kailash waghmare

अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. कैलास आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 फेब्रुवारी : तान्हाजी सारख्या बॉलिवूड सिनेमातून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता कैलास वाघमारे सध्या प्रसिद्धिझोतात आहे. नुकताच त्याचा घोडा हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर आता आणखी एका नव्या सिनेमात आणि नव्या भूमिकेत कैलास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास  वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे. आगामी ‘गाभ’  या मराठी सिनेमात कैलास प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. गाभ या सिनेमात अभिनेता कैलास दादू ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘दादू’वर आधारित आहे.  आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून  होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा सिनेमा आहे. हेही वाचा - महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची बायको फारच स्टायलिश; वेगळ्याचं प्रकारे नेसली साडी, चाहत्यांकडून कौतुक आपल्या भूमिकेबद्दल बोलताना कैलास म्हणाला की, ‘गाभ’ मधील भूमिका ही अतिशय वेगळ्या स्वरूपाची असून प्रेक्षकांसाठी तो एक सुखद धक्का असेल. आजवर केलेल्या विविध भूमिकांपेक्षा खूपच वेगळी व्यक्तिरेखा यात साकारायला मिळाली याचं समाधान आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणूस त्याच्या गुण-दोषांसह ‘हिरो’ असू शकतो, हे दर्शवणारी ही भूमिका आहे.

जाहिरात

‘गाभ’ सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात सिनेमाचं चित्रीकरण झालं आहे. येत्या मे महिन्यात सिनेमा प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनेता कैलास वाघमारे सोशल मीडियावर सक्रीय असतो. काही महिन्यांआधीचं त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास आपलं काम सांभाळून मुलीची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. नुकतंच मीनाक्षीचं देखील शुटींग सुरू झालं. तर कैलास देखील नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचं दिसतंय. दोघांनी लेकीचं नाव यारा असं ठेवलं. मीनाक्षी याराला घेऊन सिनेमाच्या सेटवर असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात