मुंबई, 23 जून : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना मागच्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुस्लिम मुलाला डेट करत आसल्यानं माझे वडील आणि भाऊ यांनी मारहाण केल्याचा खुलासा सुनैनानं काही दिसांपूर्वी केला होता. सुनैनाच्या मते ती एका मुस्लिम मुलाला डेट करत असल्यानं तिचं आयुष्य नरकाप्रमाणे झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सुनैना रुहैल अमीन नावाच्या एका जर्नलिस्टला डेट करत आहे. रुहैल एक काश्मीरी पत्रकार आहे आणि तो विवाहित आहे. तो नॉर्थ काश्मीर मधील आहे आणि सध्या दिल्लीतील एका न्यूज ऑर्गनायझेशनसाठी काम करत आहे. TMC खासदार नुसरत जहाँच्या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो पाहिले का? काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुनैना म्हणाली, मी माझा बॉयफ्रेंड रुहैलला मागच्या वर्षीच भेटले होते. मी एका मुस्लीम मुलावर प्रेम करत होते यासाठी माझ्या वडीलांनी माझ्या कानाखाली मारलं आणि म्हटलं तो आतंकदवादी आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, त्यांनी रुहैलला स्वीकारावं. आम्ही अजूनही लग्नाचा विचार केलेला नाही. पण सध्या तरी मला त्याच्या सोबत राहायचं आहे. नऊवारी साडी नेसवत या अभिनेत्रीने साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस
सूत्रांच्या माहितीनुसार सुनैना आणि रुहैल एका ऑफिसच्या माध्यमातून भेटले होते. सुनैना पुढे म्हणाली, त्याला माझ्या घरच्यांनी स्वीकारावं असं यासाठी वाटतं कारण, त्यांच्यामुळे माझं आयुष्य नरकासारखं झालं आहे आणि मी ते सहन करू शकत नाही आहे. त्यांना वाटतं की, मी रुहैलला भेटू नये. तो फक्त एक मुस्लीम आहे त्यामुळेच ते त्याला स्वीकारायला तयार नाहीत. जर तो आतंकवादी असता तर मग त्याच्या बद्दल गूगलवर माहिती का असती, तो सर्वांसमोर मीडियामध्ये का आहे. मेकअपशिवाय अशी दिसते कतरिना कैफ, फोटो झाला VIRAL हृतिकच्या यावरील मताविषयी विचारलं असता सुनैना म्हणाली, हृतिकचा याबाबत स्वतःचा काही विचार नाही. कारण तो सध्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आहे. माझ्या या नात्याबाबत घरातील कोणाही आनंदी नाही. मग तो हृतिक असो वा माझे वडील, कोणालाच हे नातं नको आहे.
काश्मीरमधील न्यूज पोर्टल काश्मीर लाइफनं रुहैलला याबाबत विचारलं असता त्यानं, माझ्याकडे याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही. बॉलिवूड ही एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी लोक तुमच्याबाबत काहीही लिहू शकतात असं उत्तर दिलं. ==================================================================== बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या व्यापाऱ्यानं टोईंग गाडीसमोर केला ‘हा’ प्रकार