बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां लग्नबंधनात अडकली. बुधवारी तिने हिंदू पद्धतीने लग्न केलं.
तृणमूल काँग्रेसच्या या खासदारने संसदेत जाऊन शपथ घेतली नाही. ती तिच्या हळदीमध्ये व्यग्र होती. नुसरतनं तिच्या हळदीचा फोटो तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केला होता ज्यात ती तिच्या वडीलांसोबत दिसली.
नुसरतनं काही दिवसांपूर्वीच निवडणूक जिंकल्यानंतर तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता.
नुसरतने आपल्या राजेशाही लग्नासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं होतं. १९ जून ते २१ जूनपर्यंत हे डेस्टिनेशन वेडिंग तुर्कीत पार पडलं. निखिल कोलकात्यातील प्रसिद्ध कपड्यांचा व्यावसायिक आहे. नुसरत आणि निखिल यांची पहिली भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजेदरम्यान झाली होती.
हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केल्यानंतर निखिल आणि नुसरतनं ख्रिश्चन पद्धतीनंही लग्न केलं. त्यांच्या या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो नुसरतनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुसरतनं शेअर केलेल्या या ख्रिश्चन वेडिंगच्या फोटोमध्ये ती व्हाइट गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर निखिलच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत आहे.
नुसरतनं हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करण्यासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं होतं. तर तिचं ख्रिश्चन वेडिंगही तिथल्याच आसपासच्या लोकेशनवर झालं आहे.
नुसरत निखिलनं त्यांच्या ख्रिश्चन वेडिंगनंतर एक बीच पार्टीही ठेवली होती. ज्यात त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते.