समीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''सुशांतच्या आठवणीत... आम्ही तुला फार मिस करतो मिस्टर टॅलेंटेड... गाण्याच्या ओळी मागे पुढे झाल्या तर चालतील पण मी रिटेक घेणार नाही.. कारण शब्दांना ठीक करण्याच्या नादात भावना कमी पडायला नकोत..' असं लिहीत अभिनेत्याने 'छीछोरे' चित्रपटातील 'तुम्हारे तसवीर के सहारे...' हे लोकप्रिय गाणं डेडिकेट केलं आहे. यावरुन समीर सुशांतचा किती मोठा चाहता आहे हे यातून दिसून येत आहे. (हे वाचा:Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात समोर आलेले रिया चक्रवर्ती ते सिद्धार्थ पिठानी सध्या कुठे आहेत? ) अभिनेता समीर परांजपे सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत काम करत आहे. यामध्ये तो अभिमन्यू जहागीरदारची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत आहे. समीरने यापूर्वी 'गोठ' या मालिकेतसुद्धा काम केलं आहे. तो मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Sushant singh raajpoot