मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात चर्चेत आलेले 'ते' चेहरे सध्या काय करतात?

Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात चर्चेत आलेले 'ते' चेहरे सध्या काय करतात?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (14 जून) मृत्यू झाला होता. या प्रकरणांमुळे बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं व काही नावे समोर आली. सध्या हे चेहेर कुठे आहेत आणि काय करतात ?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (14 जून) मृत्यू झाला होता. या प्रकरणांमुळे बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं व काही नावे समोर आली. सध्या हे चेहेर कुठे आहेत आणि काय करतात ?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (14 जून) मृत्यू झाला होता. या प्रकरणांमुळे बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं व काही नावे समोर आली. सध्या हे चेहेर कुठे आहेत आणि काय करतात ?

पुढे वाचा ...

    मुंबई, 14 जून-  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (14 जून) मृत्यू झाला होता. 34 वर्षांच्या सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईमधल्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असं सुरुवातीला मानलं गेलं होतं; मात्र नंतर राजकीय आणि नागरिकांच्या दबावामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू कऱण्यात आली. या प्रकरणी पुढे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना अटक करण्यात आली होती. पुढे बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक नावं समोर आली. या सगळ्याला दोन वर्षं झाल्यानंतर अजूनही (Sushant Singh Rajput Death Anniversary) या प्रकरणाचा तपास सुरूच आहे; मात्र या सगळ्यात चर्चेत आलेल्या व्यक्ती आता काय करतात, हे जाणून घेऊ या. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    रिया आणि शोविक

    रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) या प्रकरणात सुमारे महिनाभर तुरुंगात रहावं लागलं. जामीन मिळाल्यानंतरही ती माध्यमांपासून आणि सामाजिक जीवनापासून दूरच होती. नंतर हळूहळू तिने बॉलिवूडमधल्या काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली. या वर्षी तिने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यानंतर या वर्षीच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी राहण्याची परवानगी तिला कोर्टाने दिली होती; मात्र तिने या सोहळ्याला उपस्थित राहणं टाळलं. रियाचा भाऊ शोविक (Showik hakraborty) यालाही सीबीआयने अटक केली होती. रियाला जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यालाही जामीन मिळाला होता. त्याचं इन्स्टाग्रामचं प्रोफाइल पिक्चर अजूनही त्याचा आणि सुशांतचा फोटो आहे. इन्स्टाग्रामवर तो कुटुंबीयांसोबतचे आणि फिरतानाचे फोटो पोस्ट करत असतो. सुशांतबाबत त्याने गेल्या वर्षी 14 जूनला पोस्ट केली होती.

    श्वेतासिंह कीर्ती

    सुशांतच्या तीन बहि‍णींपैकी सोशल मीडियावर सगळ्यात जास्त असणारी श्वेता (Shweta Singh Kirti) ही नियमितपणे या प्रकरणाबाबत अपडेट पोस्ट करत होती. सोशल मीडियावर “जस्टिस फॉर सुशांतसिंह राजपूत” (Justice for Sushant Singh Rajput) हा ट्रेंड तिच्यामुळेच अधिक व्हायरल झाला होता. पुढे काही आठवडे तिने हा ट्रेंड सुरू ठेवला; मात्र या वर्षी जानेवारीमध्ये सुशांतच्या बर्थ अ‍ॅनिव्हर्सरीनंतर तिने सुशांतबद्दल काहीही पोस्ट केलं नाही.

    विशाल कीर्ती

    श्वेतासिंह कीर्तीचे पती विशाल (Vishal Kirti) हेदेखील सुरुवातीला सुशांतबाबत मोठ्या ब्लॉग पोस्ट लिहित होते. यामध्ये सुशांतचे खासगी फोटो आणि इतर माहिती असायची. यामध्ये त्याने रियावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. गेल्या वर्षी 13 जूनला त्याने सुशांतबद्दल शेवटची पोस्ट केली होती. यानंतर आता त्याच्या सोशल मीडियावर कामाशी संबंधित आणि खासगी पोस्ट्स असतात.

    प्रियांका आणि मीरूसिंह

    सुशांतची बहीण प्रियांका (Priyanka Singh) हिच्याविरुद्ध रिया चक्रवर्तीने तक्रार दाखल केली होती. सुशांतला खोटं प्रिस्क्रिप्शन दाखवून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रियाने प्रियांकावर केला होता. या तक्रारीत प्रियांकासोबत सुशांतची दुसरी बहीण मीतू (Meetu Singh) हिचंही नाव होतं. या दोघींनी हा खटला रद्द करण्याची याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मीरूचं नाव यातून काढून टाकलं. प्रियांकाविरुद्ध मात्र प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असल्याचं सांगून खटला सुरू ठेवला. या वर्षी प्रियांकाने सोशल मीडियावर म्हटलं होतं, की जोपर्यंत सुशांतला न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्याच्यावर कोणताही बायोपिक बनवू नये. ती सुशांतबद्दल नेहमी ट्विट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने मीतूसोबत एका प्रार्थना समारंभात हजेरी लावली होती. प्रियांकाप्रमाणेच मीतूदेखील नियमितपणे सुशांतबाबत पोस्ट करत असते आणि त्याला न्याय मिळावा अशी मागणी करत असते.

    (हे वाचा:Sushant Singh Rajput: बॉलिवूडने झिडकारलं आणि फॅन्सनी सावरलं; 2 वर्षानंतरही सुशांतच्या जाण्याची चाहत्यांना भासते उणीव )

    सिद्धार्थ पिठानी

    सुशांतचा मृतदेह ज्यांना सापडला होता त्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ पिठानी. या प्रकरणात ड्रग्जसंबंधी चौकशी सुरू झाल्यानंतर एनसीबीने त्याला (Sidharth Pithani) अटक केली होती. त्याला आजपर्यंत जामीन मिळाला नाही. त्याचे वकील तारक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जानेवारीमध्येच जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र त्यावर अद्याप सुनावणी होणं बाकी आहे. दरम्यान, 2021 मध्ये सिद्धार्थचं लग्न झाले. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला 15 दिवसांची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर तो पुन्हा सरेंडर झाला.

    सॅम्युएल हाओकिप

    सुशांतच्या टीममधला वकील असणारा सॅम्युएल (Samuel Haokip) सुशांतसोबतच राहत होता. सिद्धार्थसोबत सॅम्युएलही बऱ्याच टीव्ही मुलाखतींमध्ये दिसून आला. त्याने रिया आणि सुशांतबाबत कित्येक गोष्टी टीव्हीवर सांगितल्या. गेल्या वर्षी सॅम्युएलचंही लग्न झालं.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood News, Entertainment, Rhea chakraborty, Sushant Singh Rajput, Sushant singh sisters