• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: सुमोन चक्रवर्तीनं कशी सोडली सिगरेट? व्यसनमुक्तीसाठी दिल्या खास टिप्स

HBD: सुमोन चक्रवर्तीनं कशी सोडली सिगरेट? व्यसनमुक्तीसाठी दिल्या खास टिप्स

आपल्या वाढदिवाचं निमित्त साधूनच सुमोननं धुम्रपान सोडण्याची शपथ घेतली होती.

 • Share this:
  मुंबई 24 जून: ‘द कपिल शर्मा’ शोमधून (The Kapil Sharma Show) घराघरात पोहोचलेली सुमोन चक्रवर्ती (Sumona Chakravarti) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर जवळपास एक दशक ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज सुनोनचा वाढदिवस आहे. (Sumona Chakravarti birthday) 33 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी आपल्या वाढदिवाचं निमित्त साधूनच सुमोननं धुम्रपान सोडण्याची शपथ घेतली होती. तिनं धुम्रपानाचं व्यसन सोडण्यासाठी ज्या ट्रिक्स वापरल्या त्या तिनं आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर केल्या आहेत. (How to Quit Smoking) बॉलिवूडचे फॅशन डिझायनर्स EDच्या रडावर; आमदाराच्या मदतीने केला आर्थिक घोटाळा? काय आहेत टीप्स? सुमोना सेटवर सिगरेट ओढत असल्याचे काही फोटो तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होते. त्या फोटोमुळे अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली होती. काही जणांनी तर तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर देखील प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकारामुळं सुमोना आयुष्यात पहिल्यांदाच इतकी हादरली होती. तिच्या कृतीची शिक्षा तिच्या पालकांना मिळतेय ही भावना तिच्या मनात निर्माण झाली. परिणामी 30 व्या वाढदिवशी तिनं सिगरेट कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु व्यसन सोडणं काही सोपे काम नाही. यासाठी तिनं काही ट्रिक्स फॉलो केल्या. अन् त्या तिनं आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर केल्या आहेत. 88 वर्षांपूर्वी शूट केला होता पहिला इन्टिमेट सीन; अभिनेत्रीला पाहून अचाट झाले प्रेक्षक ती म्हणाली, “धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसमोर मी उभं राहणं टाळायचे. सिगरेटची तलफ आली की मी च्युइंगम चघळायचे. भरपूर पाणी प्यायचे. शिवाय सिगरेट शरीरासाठी किती घातक आहे याबद्दल सतत वाचायचे, परिणामी हळूहळू माझं धुम्रपानाचं व्यसन सुटलं. तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा.”
  Published by:Mandar Gurav
  First published: