मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडचे फॅशन डिझायनर्स EDच्या रडावर; आमदाराच्या मदतीने केला आर्थिक घोटाळा?

बॉलिवूडचे फॅशन डिझायनर्स EDच्या रडावर; आमदाराच्या मदतीने केला आर्थिक घोटाळा?

सब्‍यसाची, मनीष आणि र‍ितु कुमार यांना होऊ शकते अटक; आमदारासोबत केला कोट्यवधींचा घोटाळा?

सब्‍यसाची, मनीष आणि र‍ितु कुमार यांना होऊ शकते अटक; आमदारासोबत केला कोट्यवधींचा घोटाळा?

सब्‍यसाची, मनीष आणि र‍ितु कुमार यांना होऊ शकते अटक; आमदारासोबत केला कोट्यवधींचा घोटाळा?

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 23 जून: सक्तवसुली संचलनालयानं (ED) बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रितू कुमार (Ritu Kumar), सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) आणि मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) असे हे तीन फॅशन डिझायनर्स आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ED त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होती. दरम्यान यांनी एका बड्या राजकीय नेत्यासोबत लाखो रुपयांचा रोख व्यवहार करुन करचोरी केल्याची माहिती ED च्या हाती लागली आहे. त्यामुळं ED द्वारे लवकरच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 88 वर्षांपूर्वी शूट केला होता पहिला इन्टिमेट सीन; अभिनेत्रीला पाहून अचाट झाले प्रेक्षक EDनं पंजाब मधील एका आमदाराविरोधात मनी लाँण्डरींग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आमदाराच्या चौकशीदरम्यान रितू कुमार,  सब्यसाची मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा या तिघांची नाव समोर आली. लक्षवेधी बाब म्हणजे हे तीघही भारतातील नामांकित फॅशन डिझायनर्स आहेत. देशभरातील मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत त्यांचे घरगुती संबंध आहेत. तपासादरम्यान काही महत्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. पूनम पांडे ते राखी सावंत… हे सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी घेतात वादग्रस्त विधानांचा आधार मिळालेल्या माहितीनुसार या आमदाराच्या घरी काही वर्षांपूर्वी एक अलिशान लग्नसमारंभ पार पडला होता. या लग्नसमारंभासाठी या तिन्ही डिझायनर्सकडून कपडे घेण्यात आले होते. लाखो रुपयांच्या या कपड्यांचा व्यवहार कॅशमध्ये करण्यात आला. त्यामुळेच या तिघांविरोधात आयकर विभागाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि कर चोरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
First published:

Tags: Crime, Entertainment, Financial fraud

पुढील बातम्या