• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 88 वर्षांपूर्वी शूट केला होता पहिला इन्टिमेट सीन; अभिनेत्रीला पाहून अचाट झाले प्रेक्षक

88 वर्षांपूर्वी शूट केला होता पहिला इन्टिमेट सीन; अभिनेत्रीला पाहून अचाट झाले प्रेक्षक

‘या’ अभिनेत्रीनं दिला होता चित्रपट इतिहासातील पहिला बोल्ड सीन

 • Share this:
  मुंबई 23 जून: चित्रपट देसी असो वा विदेशी आजकाल इंटिमेट सीन्स, किंसिंग सीन, बोल्ड सीन्स वगैरे असणं हे अगदी सामान्य झालं आहे. परंतु एक काळ असाही होता, जेव्हा अशा प्रकारचे सीन्स चित्रीत केल्याची शंका जरी आली तरी चित्रपटांवर बंदी घातली जायची. अशा प्रकारच्या दृश्यांमुळं काही कलाकारांना शिक्षा देखील झाल्याचे किस्से आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील. परंतु या परंपरेला झुगारत एका दिग्दर्शकानं चित्रपटात इंटिमेट सीन्स वापरण्याचं धाडस केलं. अन् त्याचं नाव आहे गुस्ताव मचाटे (Gustav Machatý). या अवलियानं 88 वर्षांपूर्वी एक्स्टसी (Ecstasy) या चित्रपटासाठी इतिहासातील पहिला सेक्स सीन शूट केला होता. कोणाच्या नावाचं कुंकू लावतेस? बेबी बंम्बच्या फोटोनंतर नुसरत 'या' फोटोमुळे ट्रोल एक्स्टसी (Ecstasy) हा जगातील पहिला एरॉटिक ड्रामा/थ्रिलर असा चित्रपट होता. हा चित्रपट 1933 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेत्री हेडी लॅमर आणि अल्बर्ट मॉग यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. पटकथेनुसार हेडीचं लग्न एका श्रीमंत घरातील वयोवृद्ध व्यक्तीशी केलं जातं. ती गरीब असते त्यामुळं केवळ पैशांसाठी तिचे कुटुंबीय जबरदस्तीनं लग्न लावून देतात. चित्रपटात श्रीमंत व्यक्तीची भूमिका झोविमीर रोगोझ यांनी साकारली होती. पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर जास्त असल्यामुळं सतत मतभेद व्हायचे. याच दरम्यान पत्नी घरातील एक नोकराच्या अर्थात अल्बर्टच्या प्रेमात पडते. शाहरुख खान का करत नाही अक्षय कुमारसोबत काम? कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल मग पुढे दोघांचे विवाहबाह्य संबंध सुरु होतात. याच दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित होतात. हे संबंध दाखवण्यासाठी दिग्दर्शकानं दोघांचे इन्टिमेट सीन्स देखील चित्रीत केले. विषय बोल्ड शिवाय सेक्स सीन यामुळं सुरुवातीला या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. अशा चित्रपटामुळं स्त्रियांच्या मनावर विपरित परिणाम होतील असे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. परंतु मग Gustav Machatý यांनी रशियात जावून हा चित्रपट प्रदर्शित केला. एक ब्रिटीश दिग्दर्शक मदत मागण्यासाठी रशियात आलाय हेच त्यावेळेला अप्रूप मानलं गेलं. या चित्रपटाला तिथं तुफान प्रसिद्धी मिळाली त्यानंतर अमेरिका व अखेर ब्रिटनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. अन् त्यानंतर पाश्चात्य सिनेसृष्टीत किसिंग सीन सर्रास वापरले जाऊ लागले.
  Published by:Mandar Gurav
  First published: