हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी देखील स्टार प्रवाह वाहिनीला एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेत गौगी आणि उदयच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे. हे वाचा - 'तिच्या विश्वासाने आज सर्व काही दिलं'; खास व्यक्तीसाठी Bharat Jadhav ची भावनिक पोस्ट यापूर्वी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकारंनी विविध गाण्यावर डान्स केला आहे. यापैकी काही कलाकार वारंवार इन्स्टावर असे डान्सचे भन्नाट रील शेअर करत असतात. यामध्ये गौरी आणि उदय नेहमी आघाडीवर असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने देखील कमी काळाता आपला वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभु म्हणजे गौरी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांची आवडती नायिका म्हणून गौरीची ओळख बनली आहे. हे वाचा - 'आई कुठे काय करते' मालिका बंद करा' ; 'या' कारणासाठी मालिका होतेय TROLL दर्जेदार मालिका आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या कथानकाच्या माध्यमातून स्टार प्रवाहने विविध मालिका आजपर्यंत सादर केल्या आहे. या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आज या वहिनीने 'महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी' म्हणून एक वर्षाच टप्पा पूर्ण केला आहे. यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, TV serials