मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आई कुठे काय करते' मालिका बंद करा' ; 'या' कारणासाठी मालिका होतेय TROLL

'आई कुठे काय करते' मालिका बंद करा' ; 'या' कारणासाठी मालिका होतेय TROLL

आई कुठे काय (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) करते ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे.  आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडायावर केल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 सप्टेंबर ; आई कुठे काय    (Aai Kuthe Kay Karte Latest Episode )करते ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र ही मालिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत अरूंधतीचा मायाळू आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव सर्वानाच आवडत असला तरी सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना  (Aai Kuthe Kay Karte Latest News ) फारसा पटलेले नसल्याचे दिसत आहे. आता मात्र या मालिकेला प्रेक्षकांचा विरोध होताना दिसत आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडायावर केल्या आहेत.

आई कुठे काय करते ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत दाखवण्यात येणाऱी कथा काही केल्याने प्रेक्षकांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. मालिकेतील कथानकामुळे मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे.

वाचा : पिंक ड्रेससमध्ये Sai Tamhnakar चा किलर LOOK; अभिनेत्रीने मॅगझिनसाठी केलं खास फोटोशूट

संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न होऊनही अरुंधती त्याच घरात राहत आहे. आजी आणि आप्पा यांच्यासाठी अरुंधती तिथे राहत असली तरी प्रेक्षकांना ते खटकत आहे. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणं कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला पसंत पडणार नाही असं प्रेक्षकांचं मत आहे. याही पलीकडे म्हणजे अरुंधती संजनाला मदत करताना दिसत आहे. त्यामुळे अरुंधतीच्या या स्वभावावर देखील प्रेक्षकांकडून टीका होता आहे. संजना ज्याप्रमाणे अरूंधतीसोबत वागते त्याप्रमाणे अरुंधतीची मदत प्रेक्षकांना रूचलेली नाही. तसेच संजनाच्या ऑफीसमधील प्रकरणात देखील अरूंधती तिच्या मदतीला धावली आहे. यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की अरूंधती स्वत:ला लेडी जेम्स बॉन्ड समजते का?...अशा काही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक देखील अरूंधतीच्या वागण्याला कंटाळ्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

एका नेटकऱ्याने तर भली मोठी कमेंट करत म्हटले आहे की, 'असं कुठेही होत नाही. ज्या बाईने आपला 25वर्षांचा संसार मोडला त्या बाईसोबत एकाच घरात राहणं, तिला मदत करणं, समजून घेणं. हे खऱ्या आयुष्यात घडत नाही.' आणखी एका युझरने लिहिलं, 'एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिच्याबाजूने नक्की लढा द्यावा पण इथे ती बाई चुकीची निवडली आहे. आता अरुंधती सिंगल मदर आहे.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'स्त्रीवर होणार अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देतेय. मग गेली 25 वर्ष ती अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती.'...असा प्रश्नाचा भडीमार सोशल मीडियावर सुरूच आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, TV serials