मुंबई, 23 ऑक्टोबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूडची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. त्यामुळे तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. सुकेशने आता तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये सुकेशने जॅकलिन फर्नांडिसबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता जॅकलीनच्या अडचणी पुन्हा वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुकेशने पत्रात लिहिलं, ‘पीएमएलए प्रकरणात जॅकलीनला आरोपी बनवण्यात आले हे खूप दुर्दैवी आहे. मी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि याच रिलेशनशिपमुळे मी जॅकलीन आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलीनने माझ्याकडून कधीच प्रेम आणि तिच्यासोबत राहण्याशिवाय काहीही मागितले नाही. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबावर खर्च केलेला प्रत्येक पैसा कायदेशीररित्या कमावला होता आणि तो लवकरच सिद्ध होईल’. हेही वाचा - jacqueline fernandez ला कोर्टाकडून मोठा दिलासा, मात्र टेंशन अद्याप संपलेलं नाही! जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला मनी लाँड्रिंग प्रकरणात ओढण्याची गरज नव्हती. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबियांना फसवणूक प्रकरणात बळजबरीने ओढण्यात आल्याचे येत्या काळात तो न्यायालयात सिद्ध करेल. यात त्यांचा दोष नाही. सुकेशने असेही म्हटले आहे की तो एक दिवस जॅकलिनला गमावलेले सर्व काही परत करेल आणि पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेल. सुकेशने आपल्यावरील फसवणुकीच्या प्रकरणाचे वर्णन राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जॅकलीन काल 22 ऑक्टोबरला मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयात हजर झाली होती. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीनच्या अंतरिम जामीनाला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता जॅकलीनला कोर्टाकडून तत्काळ दिलासा मिळाला आहे. जॅकलीन फर्नांडिसला दिवाळीच्या मुहूर्तावर कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणी 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.