जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / jacqueline fernandez ला कोर्टाकडून मोठा दिलासा, मात्र टेंशन अद्याप संपलेलं नाही!

jacqueline fernandez ला कोर्टाकडून मोठा दिलासा, मात्र टेंशन अद्याप संपलेलं नाही!

जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नीडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नीडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जॅकलीन आज मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयात हजर झाली होती. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनच्या अंतरिम जामीनाला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता जॅकलीनला कोर्टाकडून तत्काळ दिलासा मिळाला आहे. जॅकलीन फर्नांडिसला दिवाळीच्या मुहूर्तावर कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणी 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसच्या जामीन याचिकेवरील सुनावणी 10 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तोपर्यंत जॅकलीन अंतरिम जामिनावर राहणार आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीला पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस तिची पार्टनर असल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा -  इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले अभिषेक-करिश्मा; ऐश्वर्यासोबत लोलोने काढला फोटो दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या खटल्याच्या सुनावणीदरम्यान जॅकलीन तिचे वकील प्रशांत पाटील यांच्यासह हजर होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला आरोपपत्र आणि खटल्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सर्व पक्षकारांना देण्याचे आदेश दिले. जॅकलीन 200 कोटींच्या फसवणूक  प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या जवळ होती. फसवणूक झालेल्या रकमेतून नफा घेतल्याचा आरोप तिच्यावर आहे.

जाहिरात

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूडची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. त्यामुळे तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

200 कोटींच्या खंडणीचा आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सुकेश आणखी काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात होता, असंही समोर आलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात