Home /News /entertainment /

'...तर अभिनय करायचा विचार केला नसता', अभिनेता सुबोध भावेची प्रतिक्रिया

'...तर अभिनय करायचा विचार केला नसता', अभिनेता सुबोध भावेची प्रतिक्रिया

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या फावल्या वेळात 'एव्हरग्रीन' मराठी चित्रपट पाहण्याची संधी सुबोध भावे गमावत नाही आहे. दरम्यान यावेळी त्याने अभिनय करायचा विचार केला नसता अशी प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या नेमकं सुबोध असं का म्हणाला.

    मुंबई, 02 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये मुंबई शहरात आकडा सर्वात जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातील अनेक चित्रपटांचे, मालिकांचे शूटिंगही रद्द झाले आहे. अशावेळी अनेक कलाकार क्वारंटाइनमध्ये विविध गोष्टी करत आहेत. काहींनी सोशल मीडियावर त्यांच्या दैंनदिन आयुष्यात काय सुरू आहे, याबाबत सांगितले आहे. अभिनेता सुबोध भावेदेखील याला अपवाद नाही (हे वाचा-Lockdown : घरी बसून खुशाल बघा; आता CID सीरियलही दररोज पाहता येणार) सुबोध भावे मुंबईच्या गोरेगावमधील बिंबीसार नगर या भागात राहतो. त्याठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या परिसरात अनेक मराठी कलाकार राहतात. अशा परिस्थितीत छोट्याशा कारणासाठी सुद्धा घराबाहेर पडणं मुश्किल आहे. न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुबोध घरबसल्या काय काय करतो हे सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या फॅन्ससाठी देखील अपडेट पोस्ट करत असतो. अगदी त्याची पत्नी मंजिरीला जेवणात मदत करण्यापासून ते आवडते चित्रपट बघण्यापर्यंत असाच सुबोधचा दैंनदिन क्रम झाला आहे. त्याने नुकतंच एक ट्वीट केले आहे, त्यात त्याने त्याच्या आवडत्या चित्रपटाबाबत भाष्य केले. (हे वाचा-'पॅरासाइट' चित्रपटाच्या कौतुकामुळे उर्वशी रौतेला ट्रोल, ट्वीट कॉपी केल्याचा आरोप) या ट्वीटमध्ये सुबोध म्हणाला की, 'जुना कृष्णधवल मराठी चित्रपट " अवघाची संसार" बघितला. राजा गोसावी,शरद तळवलकर,जयश्री गडकर,दामुअण्णा मालवणकर,इंदिरा चिटणीस आणि सर्व. इतकं निरागस काम करणं कधी जमेल आम्हाला? त्या काळात जन्मलो असतो तर अभिनय करायचा विचारही केला नसता. आमचं भाग्य की असे मराठी कलाकार आम्हाला लाभले.' सुबोधने अगदी 'अवघाची संसार' आणि चित्रपटातील सर्व कलाकारांचे चपखल शब्दात केलेले कौतुक सर्वांनाच आवडले आहे. अनेकांनी कमेंट करून सुबोधच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या