Lockdown : घरी बसून खुशाल बघा; आता CID सीरियलही दररोज पाहता येणार

Lockdown : घरी बसून खुशाल बघा; आता CID सीरियलही दररोज पाहता येणार

CID ही सीरियल प्रचंड लोकप्रिय होती. अनेक वर्ष ती छोट्या पडद्यावर चालली होती.

  • Share this:

मुंबई 1 एप्रिल :  लॉक डाऊनमुळे आता सगळे लोक घरात आहेत. घरी बसून नेमकं काय करायचं हा सगळ्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे दुरदर्शनसहीत सगळ्याच वाहिन्यांनी आपल्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवायला सुरूवात केली आहे. दुरर्शनने रामायण आणि महाभारत या मालिका दाखवायला सुरूवात केला. त्यानंतर अनेक वाहिन्यांनीही मालिकांचा धडाका लावला. याच मालिकेत SONY टीव्हीनेही आज महत्त्वाची घोषणा केली. CID आणि इतर दोन जुन्या मालिका आता दररोज दाखविल्या जाणार आहेत.

CID, आहत आणि ये उन दिनो की बात या तिन मालिका आजपासूनच दाखवायला सोनीने सुरुवात केली आहे. सकाळी 10 आणि रात्री 10.30 वाजता या मालिका दाखविल्या जाणार आहे. तर हॉरर शो असणारा आहत रात्री 12 वाजता दाखविणार जाणार आहे. CID ही सीरियल प्रचंड लोकप्रिय होती. अनेक वर्ष ती छोट्या पडद्यावर चालली होती.

लॉकडाउनमुळे सध्या सगळ्याच चॅनल्सचं शुटिंग बंद आहे. त्यामुळे चोविस तास द्यायचं काय आहे त्यांच्यापुढे प्रश्न आहे. तर सगळे लोक घरात असल्यामुळे मोठा प्रेक्षकवर्ग लाभणार आहे. त्या पार्श्वभूमीर या मालिका दाखविण्यात येणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे विविध राज्यांचे मुख्यमंत्री लॉकडाऊनचे पालन काटेरोरपणे करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनापासून वाचवण्यासाठी तोच एकमेव पर्याय आहे. पंतप्रधान असं म्हणाले होते की, जर लॉकडाऊनचं पालन केले नाही, तर कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज नाही लावू शकत. अशा परिस्थितीत काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत तर अनेकांना कामाशिवाय घरी बसावे लागले आहे. अशावेळी लोकांनी मागणी केल्यामुळे 80 आणि 90 च्या दशकातील दूरदर्शन (Doordarshan) प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत.

(हे वाचा-लॉकडाऊनमुळे फार्म हाऊसवरच सलमानने साजरा केला भाचा अहिलचा वाढदिवस)

त्या काळात गाजलेल्या रामायण, महाभारत, ब्योमकेश बक्शी आणि सर्कस या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी आणखी एक खूशखबर आहे. दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान (Shaktimaan) सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. शक्तिमानची भूमिका करणारे (Mukesh Khanna) यांनी यासंदर्भात एक हिंट दिली आहे.

शक्तिमानची प्रसिद्ध भूमिका करणारे आणि त्या काळात अनेकांना ‘Sorry शक्तिमान’ म्हणायला लावणारे मुकेश खन्ना यांनी नुकतीच माहिती दिली आहे की, शक्तिमानसाठी लोकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे शक्तिमानचा सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलवर गेल्या 3 वर्षांपासून काम सुरू आहे. हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे की पुढे शक्तिमानमध्ये काय घडलं, अशी माहिती खन्ना यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CID serial
First Published: Apr 1, 2020 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading