'पॅरासाइट' चित्रपटाच्या कौतुकामुळे उर्वशी रौतेला ट्रोल, ट्वीट कॉपी केल्याचा आरोप

'पॅरासाइट' चित्रपटाच्या कौतुकामुळे उर्वशी रौतेला ट्रोल, ट्वीट कॉपी केल्याचा आरोप

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाइट' (Parasite) बद्दल शेअर केलेली पोस्ट ट्विटरवर ट्रोल झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : देशभरात लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सशी संवाद साधत आहेत. उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) देखील असंच एक ट्वीट केलं आहे. मात्र या ट्वीटमुळे ती खूपच ट्रोल झाली आहे. उर्वशीने ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाइट' (Parasite) बद्दल शेअर केलेली पोस्ट ट्विटरवर ट्रोल झाली आहे.

(हे वाचा-पुन्हा एकदा डॉ. मशहूर गुलाटीची धमाल! कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर दिसणार एकत्र)

ऑस्कर  विजेता सिनेमा पॅरॅसाइट काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राइम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी त्या चित्रपटाबाबत आपापली समीक्षा लिहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील त्यासंदर्भात एक ट्वीट केलं. या चित्रपटाबाबत तिला कोणती बाब आवडली, हे तिने ट्वीटमध्ये मांडलं आहे.

(हे वाचा-'माझा नवराच मला समलैंगिक समजत होता' सनी लिओनीचा धक्कादायक खुलासा)

मात्र झालं असं की, तिने हे ट्वीट न्यूयॉर्कमधील लेखकाचं कॉपी केलं असल्याची टीका एका ट्विटर युजरने केली आहे. श्रीमी वर्मा या ट्वीटर युजरने दोन्ही ट्वीटचा स्क्रीनशॉट एकत्र करून फोटो देखील शेअर केला आहे. 'एखाद्याचं ट्वीट कॉपी करण्यापेक्षा तिने निदान व्याकरण सुधारून/बदलणं गरजेचं होतं', अशी कॅप्शन देत या युजरने ट्वीट केलं आहे. तिचं हे ट्वीट मुळ लेखकाने सुद्धा रिट्वीट केलं आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर उर्वशी रौतेलाच्या ट्वीटवर ट्रोल करणाऱ्या कमेंंट्स आल्या आहेत. ट्वीट कॉपी करून लेखकाला साधं क्रेडिट देखील न दिल्यामुळे उर्वशीवर टिका करण्यात येत आहे. उर्वशीची पॅरासाइटसारख्या गंभीर विषयावरील चित्रपटावर मत मांडण्याची क्षमता नाही अशी टीकी अनेकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2020 06:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading