सुबोधनं यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा मल्हार आणि कान्हा जमिनीवर झोपून लुडो खेळताना दिसत आहे आणि हा लुडो साधा लुडो नाही. तर भावे फॅमिलीनं संपूर्ण चादरीवरच लुडो बोर्ड बनवला आहे. सुबोधनं शेअर केलेल्या या फोटोवर अनेक मराठी स्टर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर विनोदी कमेंट केल्या आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण टाइमपास म्हणून लुडो खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तर यावर अनेक मीम्स सुद्धा तयार करण्यात आले होते. ज्यात लुडोला जागतिक खेळाचा दर्जा द्यावा असं विनोदानं म्हणण्यात आलं होतं. त्यात आता सुबोधनं असा फोटो शेअर करत अधिकच रंगत आणली आहे. (संपादन- मेघा जेठे.) श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Subodh bhave