मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...

हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...

बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला हृतिक त्याच्या सहाव्या बोटामुळे नेहमीच चर्चेत होता.

बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला हृतिक त्याच्या सहाव्या बोटामुळे नेहमीच चर्चेत होता.

बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला हृतिक त्याच्या सहाव्या बोटामुळे नेहमीच चर्चेत होता.

  मुंबई, 3 मे : बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला हृतिक त्याच्या सहाव्या बोटामुळे नेहमीच चर्चेत होता. हृतिकच्या हातांना 10 नव्हे तर 11 बोटं असल्याने तो एकेकाळी फार चर्चेत होता. हृतिकला त्याच्या 11 बोटांमुळे फार त्रास सहन करावा लागला होता. एका हाताला सहा बोटं असल्यामुळे शाळेतल्या दिवसांमध्ये त्याला अतिशय वाईट वाटायचं. याबद्दल हृतिकने अनेकवेळा मुलाखतीमध्येही सांगितलं आहे. शाळेत असताना हृतिकचे मित्र दोन अंगठ्यावरून त्याची टिंगल करायचे. त्यामुळे शाळेमध्ये त्याला आपण इतरांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटायचं. मित्रांच्या सततच्या चिडवण्यामुळे हृतिक त्या मित्रांपासून लांबच राहायचा. बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्यावेळी हृतिकला ही गोष्ट फार त्रासदायक ठरणार होती. मोठ्या पडद्यावर त्याने दोन अंगठे असलेला हाथ अनेकवेळा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. एकदा दोन अंगठे असलेल्या हृतिकच्या हातावरील एक अंगठा त्याने कापण्याचा निर्णयही घेतला होता. 'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल' सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीनाची नाराजी
  अंगठा कापण्याच्या निर्णयावर त्याने वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली आणि ते हृतिकच्या अंगठ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झाले. पण हृतिकची आई पिंकी रोशन यांना मात्र हे मान्य नव्हतं. लहानपणापासून जर या अंगठ्यामुळे हृतिकला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही तर त्यानं हा अंगठा कापणं चुकीचं आहे, असं त्याच्या आईला वाटत होतं. शेवटी हृतिकने आईचं म्हणणं ऐकून ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला. लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC खेळण्याची संधी, असं करा रजिस्ट्रेशन
  View this post on Instagram

  When you become the pose. Or has the pose become you?

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

  सध्या हृतिक रोशन त्याची एक्स वाइफ सुझानसोबत मुलांना वेळ देताना दिसत आहे. सुझान आणि हृतिक यांनी घटस्फोट घेतला असला तरीही त्यांनी सध्याच्या लॉकडाऊनमध्ये मुलांना त्रास होऊ नये यासाठी या दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असून सध्या सुझान हृतिकच्या घरी राहत आहे. अर्थात घटस्फोट झाला असला तरीही हृतिक आणि सुझानची मैत्री तशीच असल्याचं नेहमीच पाहायला मिळालं हृतिकच्या अनेक कठीण प्रसंगात सुझान त्यांच्या पाठिशी उभी राहिली होती. (संपादन- मेघा जेठे.) लॉकडाऊनमध्येही सलमान खान जिममध्ये गाळतोय घाम, जॅकलीननं शेअर केला PHOTO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या